ब्रेकिंग न्युजराजकीय
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक;
सोयाबीन, कापूस आंदोलन पेटण्याची शक्यता
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक;
सोयाबीन, कापूस आंदोलन पेटण्याची शक्यता..
——————————
बुलढाणा ता. २५ ः ( प्रतिनिधी )
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. तुपकर यांच्या चिखली रोडवरील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे सोयाबीन कापसाचे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
नुकताच २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात झालेल्या एल्गार महामोर्चाला जिल्हाभरातून हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्याच्या व इतर मागण्यांचा विचार न झाल्यास, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईत धडकल देऊन, २९ तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. या बाबत त्यांना शुक्रवारी पोलिसांनी नोटीसही बजावली होती.
- मात्र अशा नोटिसांना आपण भीक घालीत नसल्याचे तुपकर यांनी म्हटले होते. दरम्यान आज त्यांच्या अटकेची पूर्वतयारी करुन, बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी तुपकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या घरी पोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर जेवण करताना तुपकर यांनी आम्ही काय दोन नंबरचे धंदे करतो का, गुन्हेगार मोकाट फिरत असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने करणाऱ्यांवर पोलीसांकरवी कारवाईची दडपशाही करीत असल्याने सरकारचा निषेध केला होता. हा सर्व प्रकार त्यांनी फेसबुकबरुन लाईव्ह केल्याने, ही घटना त्याच क्षणी राज्यभरात पोचली असल्याने, या घटनेकडे शेतकऱ्यांसह जिल्हा व राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.