आर्थिकब्रेकिंग न्युज

बघा… दिवाळीत साईचरणी किती  झाला दानधर्म

साईबाबांच्या चरणी दिवाळीच्या मोसमात तब्बल १७ कोटींचे दान

बघा… दिवाळीत साईचरणी किती  झाला दानधर्म
—————————————————
साईबाबांच्या चरणी दिवाळीच्या मोसमात तब्बल १७ कोटींचे दान

संगमनेर, ता. २५ ः ( प्रतिनिधी )

जीवंतपणी फकीर म्हणवल्या जाणाऱ्या श्री साईबाबांचे भक्त देश विदेशात पोचले आहेत. आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्राचा मान असलेल्या श्री साईबाबांचे शिर्डी येथील देवस्थान अत्यंत प्रसिध्द आहे.

जिल्ह्यासह देशभरातील भक्तगण श्री साईंच्या चरणी आपल्या व्यथा वेदना घेऊन नतमस्तक होतात. शिर्डी देवस्थान काकडी येथील विमानतळामुळे देशभराशी जोडले गेल्याने तसेच नव्याने झालेल्या समृध्दी महामार्गामुळे भक्तगणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषतः दसरा, दिवाळी, रामनवमी या सणासुदीच्या काळात तसेच सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनाने करण्याची इच्छा बाळगलेल्या भक्तांमुळे शिर्डी देवस्थान ओसंडून वाहते. आलेले भक्त साईंवरील श्रध्देपोटी आपल्या आर्थिक कुवतीनुसार भरभरुन दान टाकतात. या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत १० ते २० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या उत्सव काळात साईसंस्थानला विविध स्वरुपात तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार ८६ इतकं भरघोस दान प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली. अर्थात या दहा दिवसांत साईबाबांच्या चरणी दररोज सुमारे पावणे दोन कोटी रुपये प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या दानामध्ये रोख स्‍वरुपात ७ कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ रुपये दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाले आहेत. देणगी काऊंटरवर ३ कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी २ कोटी ३१ लाख ८५ हजार ६०० रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डी.डी.देणगी, मनी ऑर्डर ३ कोटी ७० लाख ९४ हजार ४२३, तर सोने ८१० ग्रॅम रक्‍कम २२ लाख ६७ हजार १८९ रुपये, चांदी ८२११.२०० ग्रॅम रक्‍कम रुपये ४ लाख ४९ हजार ७३१ यांचा समावेश आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!