संविधान दिनानिमित्त चंदनापुरी येथे भव्य संविधान रॅली
रॅलीत छात्रभारती विद्यार्थी संघटना सहभागी
संविधान दिनानिमित्त चंदनापुरी येथे भव्य संविधान रॅली
रॅलीत छात्रभारती विद्यार्थी संघटना सहभागी
संगमनेर दि 26 प्रतिनिधी
छात्रभारती विद्यार्थी संघटना ,सावित्रीबाई फुले संविधान गटाच्या वतीने संविधान जनजागृती साठी प्रभातफेरी काढण्यात आली.
भारताचे संविधान हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेतले पाहिजे. आपले हक्क अधिकार हे संविधानाने सर्वाना दिलेले आहे. हे संविधान आजही कित्येक लोक समजून घेत नाही. समाजातील असणाऱ्या भेदभाव करणाऱ्या जुन्या ,रूढी परंपरा संपवून संविधानाने सर्वाना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. सामजिक न्याय ,स्वातंत्र्य , बंधुता ,अशी मूल्ये माणसामध्ये रुजविण्याचे काम संविधान करत आहे.
या कार्यक्रमात महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते ,बेटी बचाव चळवळीच्या नेत्या वर्षा देशपांडे ,कॉलेज प्राचार्य खेमनर सर ,छात्रभारती चे राज्य कार्यवाह अनिकेत घुले ,राहुल जऱ्हाड गणेश जोंधळे ,तृप्ती जोर्वेकर ,कावेरी आहेर ,राधेश्याम थिटमें ,रघुनाथ भालेराव ,शैला भालेराव ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते .