पोस्टाच्या योजना फायदेशीर – रविकुमार झावरे
पोस्टाच्या योजना फायदेशीर – रविकुमार झावरे
संगमनेर दि 11 प्रतिनिधी
मुख्य डाक घर अन संगमनेर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच संगमनेर येथे “डाक समुदाय विकास कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी संगमनेर उपविभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक रविकुमार झावरे अन कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक विलास गावित उपस्थित होते.रविकुमार झावरे बोलताना म्हणाले कि,केंद्र सरकारच्या योजना या डाक विभागामार्फत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन “डाक समुदाय विकास कार्यक्रम” देशभरात आयोजित केले जात आहेत.पोस्टाच्या सर्वच बचत योजना या सर्व सामन्यांसाठी फायदेशीर आहेत. बदलत्या काळानुसार पोस्टाने केलेल्या बदलांमुळे सामान्य माणसांचा पोस्ट खात्यावर अजूनही मोठा विश्वास आहे.
कृषी पर्यवेक्षक विलास गावित बोलताना म्हणाले कि,पोस्टाच्या योजना या सर्व सामान्य लोकांना परवडणार्या असून त्याची जनजागृती होणे आवश्यक आहे.कृषी विभागामार्फत चालवणाऱ्या बचत गटांमार्फत देखील या योजना तळागाळात पोहोण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.सदर कार्यक्रमात पोस्टाच्या विविध योजनांची माहिती पोस्टमास्तर महेश कोबरणे अन अमोल गवांदे यांनी दिली.कार्यक्रमात डाक विभागामार्फत राबवल्या जाणार्या “नारी शक्ती” अभियानाची माहिती देत सर्व महिलांनी या मोहिमेत भाग घेऊन सुकन्या समृद्धी योजना ,महिला सन्मान बचत पत्र योजना यामध्ये बचत करावी असे आवाहन संगमनेर उपविभागाचे विपणन अधिकारी अमित देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी संगमनेर अन अकोले तालुक्यातील सर्व शाखा डाकपाल तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाक आवेक्षक राधाकिसन देशमुख,काळू सदगीर ,शाखा डाकपाल विशाल कोल्हे, रोहित भागवत यांनी विशेष परिश्रम घेतले.