आपला जिल्हाआर्थिक
पहा काय म्हणताहेत उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ.. कोणत्या क्षेत्रात असेल सर्वाधिक संधी…
भविष्यात फूड इंडस्ट्री सर्वाधिक संधी असलेले क्षेत्र ः डॉ. सुजित खिलारी
संगमनेर, ता. १६ ः ( प्रतिनिधी )
दूध म्हणजे पूर्णान्न, त्यामुळे कर्करोगासारखे कोणतेही आजार होत नाहीत. सर्वांनी आपल्या दैनंदिन आहारात दूधाचा समावेश केल्यास आपल्याच शेतकरी बांधवांना सातत्याने रास्त दर मिळेल. बाजारातून स्वस्तात मिळते म्हणून विकत घेत असलेले पनीर भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करण्याची आवश्यकता आहे. सहकारी तत्वावरील दूध संघात भेसळीसारखी कृत्ये होत नसल्याने ग्राहकांनी विश्वासाने सहकारी दूध संघाची उत्पादने खरेदी करावीत अशी आग्रही भुमिका मांडताना ‘ शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास ‘ हे राजहंस दुध संघाचे ब्रीदवाक्य असल्याचे प्रतिपादन संगमनेर सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांनी केले. मयूर एक्सप्रेस हॉटेलच्या शानदार परिसरात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सॅटर्डे क्लब संगमनेरच्या उद्योजकांनी विचारलेल्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर त्यांनी समर्पक व मनमोकळेपणे सविस्तर माहिती दिली. या वेळी मालुंजकर काचवाले या नावाने प्रसिद्ध असलेले नानासाहेब मालुंजकर यांनी आपल्या व्यवसायाचे सर्वांसमोर सादरीकरण केले. याप्रसंगी नाशिक, नगर रिजनचे डेप्युटी रिजन हेड, कर सल्लागार सागर हासे उपस्थित होते. संगमनेर चॅप्टरचे चेअरमन डॉ. सागर गोपाळे यांनी भावी काळात फूड इंडस्ट्री मध्ये काम करू इच्छिणाऱ्या मेम्बर्सला मार्गदर्शन करण्याची विनंती डॉ. खिलारी यांना केली.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट संगमनेर चाप्टर डॉ. अमोल कासार यांनी नाशिक ,नगर रीजन हेड यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकांच्या हिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवले आहेत.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रधार संगमनेर चॅप्टरचे सेक्रेटरी अण्णासाहेब थोरात यांनी हा सर्व योगायोग जुळवून आणला. भविष्यातही अशा अनेक यशस्वी व्यक्तींना सॅटर्डे क्लबच्या व्यासपीठावर आमंत्रित करून नवीन उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी होणारी ही मिटिंग सर्व उद्योजक, व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगची एक सुवर्णसंधी असते त्याचा सर्व उद्योजक, व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सॅटर्डे क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
Kyle Ventura