आपला जिल्हाब्रेकिंग न्युज
चंदनापूरी जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात….
स्विफ्ट कारवर मालवाहतुकीचा आयशर कंटेनर कोसळल्याने झाला अपघात..
अकोले येथील पाच जण गंभीर जखमी
संगमनेर, ता. १७ ः ( प्रतिनिधी )
पुण्याकडून संगमनेर कडे येणाऱ्या लेनवरील मालवाहतूक करणारा आयशर कंटेनर युपी 24 टी. 8550 त्याच दिशेने मात्र सर्व्हिस रोडवरुन संगमनेरकडे जाणारी स्विफ्ट कार ( एमएच. 17 एजे. 2696 ) वर पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार अकोले तालुक्यातील असल्याचे समजते. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंदनापूरी गावाजवळील जवळेवस्ती परिसरातील पांडुरंग ढाब्याच्या परिसरात झाला.
अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ व डोळासणे महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, मोठ्या प्रयासाने दबलेल्या कारमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या गंभीर अपघातात आशा सुरेश धारणकर ( 42 ), सुनील धारणकर ( 65 ), अभय सुरेश धारणकर ( 45 ) व ओजवी धारणकर ( वय 2 वर्ष ) सर्व राहणार कुंभेफळ, ता. अकोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, अस्मिता अभय मिसाळ ( 40 ) किरकोळ जखमी झाल्याची पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.