Uncategorizedआपला जिल्हामनोरंजन

स्टुडंट टॅलेंट परीक्षेत सोहम कडलग तालुक्यात पहिला

टॅलेंट परीक्षेत मिळवले 212 गुण......

संगमनेर ( प्रतिनिधी ) ः
तालुक्यातील घुलेवाडी येथील आनंदवन विद्यालयाचा विद्यार्थी सोहम मनोज कडलग याने स्टुडंट टॅलेंट परीक्षा २०२४ मध्ये २१२ गुण प्राप्त करत तालुक्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट परीक्षा २०२४ मध्ये आनंदवन विद्यालयाचा इयत्ता ५ वीचा विद्यार्थी सोहम मनोज कडलग तालुक्यात प्रथम, दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचे कौस्तुभ गोरक्ष सरोदे , द्वितीय, तर गगन संदीप शिंदे तालुक्यात तृतीय आले आहेत.
जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी हिंद सेवा मंडळामार्फत या परीक्षेचे आयोजन केले जाते. सोहम कडलग यास वर्ग शिक्षिका भारती केकाने चौधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे कडलगचे मुख्याध्यापक विलास शिरोळे, प्रकाश भागवत, मनीषा देशमुख, अनिल कडलग, दिलीप शेटे, वडील मनोज कडलग व आई उमा कडलग यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्ल सोहम कडलग याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश कडलग, महिंद्र गुंजाळ, भाऊसाहेब घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर, वैशाली मयूर, कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग , वृषाली कडलग , प्रा. अमोल कडलग , किरण देशमुख, उद्योजक अशोक सिनारे यांनी अभिनंदन केले आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!