ब्रेकिंग न्युजराजकीय

काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांचा आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

आशा सेविकांच्या प्रश्नांबाबत आमदार थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांचा आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

आशा सेविकांच्या प्रश्नांबाबत आमदार थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

संगमनेर / मुंबई ( प्रतिनिधी )

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून यामुळे राज्यातील सर्व आशासेविका संपावर आहेत. अत्यंत अल्प मानधनावर काम करणाऱ्या या आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून या आंदोलनात तातडीने हस्तक्षेप करून हा  प्रश्न सोडवण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

मा.महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, राज्यातील आरोग्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविका व गटप्रवर्तक भगिनींचे 12 फेब्रुवारी 2024 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आपण स्वतः भेट दिली असून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत. शासनाने यापूर्वी मान्य केलेल्या परंतु अंमलबजावणी न झालेल्या मागण्यांच्या संदर्भाने हा संप सुरू आहे.

एकतर राज्यात अपुरे मनुष्यबळ आणि सुविधांअभावी आरोग्यवस्था चिंताजनक असून आशा काळात आशा भगिनींचे आंदोलन तातडीने संपवणे सरकारची प्रमुख जबाबदारी आहे.राज्यभरात सुमारे 75 हजार आशा सेविका व 3500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांच्या मानधन वाढीचा निर्णय घेण्यात आला .मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे या सर्व भगिनींनी संपाची हत्यार उचलले आहे.

त्यामुळे सरकारने तातडीने आशा सेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट 200 रुपये दिवाळीपूर्वी द्यावी,तसेच अशा सेविकांना 7 हजार रुपये तर गटप्रवर्तक यांना 10 हजार रुपये ने मोबदला वाढविणे. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे व त्यांचा थकीत मोबदला अदा करणे, आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे मूल्यमापन यशदा मार्फत करणे. त्यांना प्रसूती रजा, इतर रजा, सामाजिक सुरक्षा लागू करणे या मागण्यांबाबत सरकारने तातडीने मान्य केल्या पाहिजे.

यामधील अनेक मागण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने अत्यंत सकारात्मक निर्णय घेतले होते . मात्र त्यावेळी सरकार बदलल्याने त्याची अंमलबजावणी करता आली नाही. आणि आत्ताचे सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही. तरी  मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने या भगिनींच्या आंदोलनामध्ये लक्ष घालून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे अशी मागणी ही काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आशा सेविकांसाठी प्रश्नांसाठी डॉ जयश्रीताई थोरात यांचा पुढाकार

आरोग्यव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आशा सेविका यांचे विविध प्रश्न सोडवण्याबाबत कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून कोरोना काळात या भगिनींनी केल्याच्या कामाचा गौरव म्हणून त्यांनी कौतुक सोहळा आयोजित करून सर्वांच्या कार्याचा सन्मान केला. याचबरोबर या भगिनींच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने त्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!