ब्रेकिंग न्युजराजकीय

वाळू तस्करांचा महसूल मंत्री विखेंसोबत सर्रास वावर

वाळू तस्करांचा महसूल मंत्री विखेंसोबत सर्रास वावर

संगमनेर ( प्रतिनिधी )

दडपशाहीचे राजकारण अहमदनगर जिल्ह्यात सुरू असून प्रशासन व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. मात्र वाळू तस्करी करत असलेले व ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. असे अनेक जण विद्यमान महसूल मंत्री विखे यांच्यासोबत सर्रासपणे सार्वजनिक कार्यक्रमांमधून वावरत आहेत.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे वाळू तस्करांवर छापे घातले.या कारवाईत दोन पिकअप, दीड ब्रास वाळू सह 6 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी वाळू तस्कर पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना पकडले गेले. या वाळू तस्करी शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रमेश काळे, यांच्यासह दोघांवर पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू तस्करीतून सर्वसामान्यांवर धाक निर्माण करणारे हे वाळू तस्कर मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सोबत संगमनेर तालुक्यात सातत्याने फिरत असून यामुळे प्रशासनावरही दबाव येत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्थानिक कार्यकर्ते या वाळू तस्करांसोबत असून हे लागेबंधे असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. वाळू तस्करांनी विरुद्ध कारवाईच्या घोषणा या विखे यांच्याकडून फक्त दाखवण्यापुरत्या केल्या जात आहे अशी चर्चाही सर्रास सुरू आहे.

खरे तर भाजपा हा लोकशाही न मानणारा पक्ष असून एकाधिकारशाही व दडपशाही निर्माण करणार आहे. याचीच प्रचिती अहमदनगर जिल्हा सह संगमनेर तालुक्यात येत असून वाळू तस्करांना मात्र अभय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विद्यमान सरकार महसूल मंत्री विखे वाळू तस्कर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध मोठी चीड निर्माण झाली आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!