ब्रेकिंग न्युजराजकीय
संगमनेर भाजपची अंतर्गत धुसफूस आली समोर ; अध्यक्ष चार दिवस नॉट रिचेबल ?
तालुकाअध्यक्षांच्या शोधात वरिष्ठ संगमनेरात?
संगमनेर भाजपची अंतर्गत धुसफूस आली समोर
तालुकाअध्यक्षांच्या शोधत वरिष्ठ संगमनेरात?
संगमनेर दि 7 प्रतिनिधी
संगमनेर भाजपमध्ये संघटनात्मक धुसफूस सुरू असल्याचे तालुका अध्यक्षांच्या पत्राने समोर आला आहे. तालुका कार्यकारिणी नुकतीच तीन महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली जाहिर करण्यात आली होती. यातील एका पदाधिकाऱ्यांने पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत तालुका अध्यक्षांना वरिष्ठांचे फोन सुरू झाले, मात्र चार ते पाच दिवस फोन बंद करून बसलेल्या तालुका अध्यक्षांना वरिष्ठ थेट घरीच पाहायला आले. तेथेही ते न भेटल्याने गैरसमज वाढतच गेला. आणि शेवटी मर्जीने पद सोडत असल्याचे पत्रच त्यांनी जिल्हा अध्यक्षांना दिले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात कार्यकारिणीत चाललेली रणनीती काय रंग उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जिल्ह्याचे तथा राज्याचे महत्वाचे मानले जाणारे नेत्यांचे कोणतरी कान भरत असल्याचे बोलले जाते. स्थानिक कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हेवेदावे समोर आणत बुथ पातळीवरील एका कार्यकर्त्याला राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला, दबाव टाकूनही राजीनामा देत नाही म्हणून चक्क तालुकाध्यक्ष ना संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी दबाव टाकण्यात आला मात्र प्रदेश कार्यालयातुन या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे यामुळे तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला तर नव्या कार्यकर्त्यांनी थेट महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्याला मान खाली घालायला लावली आहे.
भाजप पक्ष संघटन समजून घेण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी अनेक शिबिराचां उपक्रम राबवून लाभ घेतला आहे, मात्र नव्यानेच पक्षात आलेल्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना व्यक्तिनिष्ठ राजकारणांचे धडे शिकवले जातात, यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांची संख्या अधिक वाढत चालली खरी पंरतु ही पद्धत येणाऱ्या लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा नेत्यांना मान खाली घालवायला लावेल असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.
संगमनेरचे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी अध्यक्ष पदावर काम न करण्याची भावना जिल्हा अध्यक्षांकडे व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी तालुका अध्यक्ष पदासह संगमनेर तालुका मंडळ कार्यकारणी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाध्यक्षांनी घेतला. त्यामुळे संगमनेरच्या कार्यकारणीत असंतोष निर्माण झाल्याचे उघडपणे दिसून येते.