ब्रेकिंग न्युज

अकोल्यातून अवैध उत्खनन केलेला मुरूम संगमनेरात शासकीय कामांसाठी वापर

महसूल विभागाचे दुर्लक्ष ; तस्करांवर कारवाईची मागणी

अकोल्यातून अवैध उत्खनन केलेला मुरूम संगमनेरात शासकीय कामांसाठी वापर

महसूल विभागाचे दुर्लक्ष ; तस्करांवर कारवाईची मागणी

संगमनेर / अकोले

अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावातून डोंगरच्या डोंगर सपाट करून एका मुरूम तस्कराने संगमनेर तालुक्यातील ठेकेदारांना पाठविले. विशेष म्हणजे अवैध उत्खनन करून हा मुरूम शासकीय कामांसाठी वापरला जात आहे. यासाठी संबंधित तस्कराने शेकडो ब्रासचा परवाना काढला असून त्याबदल्यात हजारों ब्रास मुरूमचे उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे त्या तस्करावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांसह विविध शासकीय कामे सुरू आहेत. यासाठी लागणारा मुरूम अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी या गावातून येतो. इथल्या एका ठेकेदाराने डोंगरांवर उत्खनन करण्याचा परवाना काढला आहे. यासाठी त्याने शेकडो ब्राससाठीचा परवाना काढून शासकीय रॉयल्टी भरण्यात आली आहे. मात्र ज्या प्रमाणात परवानगी मिळाली त्यापेक्षा हजारोच्या पटीत याठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक डोंगर भुईसपाट झाले आहेत.·

याच बरोबर गावातून दिवसभरात अनेक डंपर ये जा करत असल्याने सर्वत्र धूळ पसरली असल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणचा परवाना काढला त्या ठिकाणी उत्खनन करण्याऐवजी भलत्याच ठिकाणचे डोंगर पोखरण्याचे काम तो मुजोर तस्कर करत आहे. मात्र त्या गौण खनिज तस्कराच्या दहशतीलमुळे त्रासाला कंटाळून देखील कोणी समोर येत नाही. याला जबाबदार स्थानिक आमदारांसह, तलाठी, मंडलाधिकारी आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे एकदा महसुलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळ्यावरची पट्टी बाजूला करून त्या ठेकेदारावर कारवाईचे धाडस करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!