कोल्हेवाडी रस्त्यावर राडा ; लहान मुलांचाही विचार केला नाही
एका समाजाच्या जमावाने चौघांना केली बेदम मारहाण
कोल्हेवाडी रस्त्यावर राडा ; लहान मुलांचाही विचार केला नाही
एका समाजाच्या जमावाने चौघांना केली बेदम मारहाण
संगमनेर
जोर्वे नाका परिसर नेहमीच चर्चेत राहिला आहे. एक वर्षापूर्वी झालेल्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाली असून आज संध्याकाळी कोल्हेवाडी येथील चौघांना कोल्हेवाडी रस्त्यावर एका पिकअप चालकाकडून बेदम मारहाण करण्यात आली असून क्षणार्धात शेकडो लोकांचा जमाव झाला आणि चौघांना मारहाण केली. यावेळी त्यांच्यासोबत दोन लहान मुली होत्या त्या जमावाने त्यांचाही विचार केला नसल्याने त्यांची क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे.
संगमनेर शहरातील जोर्वे नाका हा परिसर नेहमीच वादात राहिला आहे. आज संध्याकाळी कोल्हेवाडीचे काही नागरीक घराच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना जनावरे घेऊन जाणाऱ्या पिकअपचा कट बसला. यावेळी त्यांनी चालकाला विचारणा केली असता चालकाने त्यांना डोळ्यात धूळ जात असेल तर गॉगल घाल म्हणत शिवीगाळ केली. आणि गाडीच्या खाली उतरून मारहाण करायला सुरुवात केली. बघता बघता त्याठिकाणी शेकडोंचा जमाव जमा झाला.
घाबरलेल्या अवस्थेत ते चौघेजण शहर पोलीस ठाण्यात आले. यावेळी तालुक्यातील हिंदू संघटनांनी मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. याच जोर्वे नाक्यावर याअगोदरही मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र याठिकाणी पोलीस चौकी नावाला बांधून ठेवली आहे. आज झालेल्या घटनेत एका दुचाकीवर दोन छोट्या छोट्या मुली होत्या परंतु मानगुटीवर बसलेल्या समाज घातक लोकांनी मारहाण करण्याचे थांबवले नाही. त्यामुळे त्या चौघांनी थेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटना पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित आहेत.