अमृतवाहिनीत 15 व 16 मार्चला मेधा महोत्सवाचे आयोजन…
आ.थोरात, प्रा.नितीन बानगुडे सह विविध सिने कलावंतांची उपस्थिती...
अमृतवाहिनीत 15 व 16 मार्चला मेधा महोत्सवाचे आयोजन…
आ.थोरात, प्रा.नितीन बानगुडे सह विविध सिने कलावंतांची उपस्थिती…

संगमनेर ( प्रतिनिधी )- काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाने देशात लौकिक मिळवलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होत असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेधा सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवार दिनांक 15 मार्च ते शनिवार दिनांक 16 मार्च 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सौ. शरयूताई देशमुख म्हणाल्या की, युवानेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून मागील सात वर्षापासून अमृतवाहिनीत मेधा महोत्सव होत असतो. यामध्ये शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर,आयपीएस अधिकारी विश्वास पाटील, कृष्णप्रकाश, सिनेअभिनेता विवेक ओबेराय, सिनेअभिनेत्री मानसी नाईक,सोनाली कुलकर्णी,शेखर सुमन, अध्ययन सुमन, हास्य सम्राट भाऊ कदम, कुशल बद्रिके, संस्कृती बानगुडे, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे यांसह विविध कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
यावर्षी हा मेधा महोत्सव शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 व शनिवार दिनांक 16 मार्च 2024 या कालावधीत अमृतवाहिनीतील मेधा मैदानावर होत आहे.यामध्ये शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 11 वा. प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे, आयआयटी मुंबईचे प्रा.डॉ.क्षितिज जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा. आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत मेधा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध दोन मराठी सिने अभिनेत्री उपस्थित राहणार आहे.
शनिवारी सकाळी 11 वाजता मार्गदर्शनासाठी भारतीय हॉकी संघातील स्टार खेळाडू युवराज वाल्मिकी उपस्थित राहणार आहे. तर संध्याकाळी 6 वा. विविध चित्रपट अभिनेत्यांच्या उपस्थितीत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम व म्युझिकल स्पोर्ट होणार आहेत.
या कार्यक्रमात मिमिक्री, डान्स, ग्रुप डान्स,गायन,वादन,ड्रामा, पेंटिंग,व्याख्याने याशिवाय विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य मेधा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. हा मेधा महोत्सव विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजन केला असून या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्यंकटेश,मेधाचे समन्वयक प्रा.जी.बी.काळे,प्राचार्य डॉ.मनोज शिरभाते, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ.बी.एम.लोंढे,शितल गायकवाड,सौ.जे.बी.सेट्टी,अंजली कन्नवार, विलास भाटे, डॉ.जे.बी.गुरव,प्राडॉ.विलास शिंदे, प्रा वाळे यांचे सह विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतवाहिनी संस्थेच्या सर्व विभागांच्या वतीने करण्यात आले आहे.