आपला जिल्हा

पंचायतराज अभियानात  संगमनेर पंचायत समितीला विभागस्तरावरील  पुरस्कार प्रदान 

हे यश सांघिक प्रयत्नांमुळे मिळाले - अनिल नागणे ( गटविकास अधिकारी )

संगमनेर, प्रतिनीधी 

महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या यशवंत  पंचायतराज विकास अभियानात संगमनेर पंचायत समितीने सहा लाख रुपयांचा विभागस्तरावरील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. नाशिक महसूल आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार गटविकास अधिकारी अनिल नागणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला.

महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थांचे योगदान मोठे आहे. या संस्थेमार्फत राज्यातील विकासाच्या सर्व योजना राबवल्या जातात. शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पंचायतराज संस्थांच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करुन, त्यांची कार्यसंस्कृती वाढवण्यासाठी राज्यात पंचायतराज संस्थांमधुन प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामात उत्कृष्ठ काम करणाऱ्या पंचायत समित्यांसाठी विभाग व राज्यस्तरावर यशवंत पंचायतराज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या अभियानामध्ये सन 2022-2023 मध्ये संगमनेर पंचायत समितीला नाशिक विभागस्तरावरील सहा लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार गटविकास अधिकारी अनिल नागणेंसह पंचायत समितीच्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारला. या वेळी संगमनेर पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी प्रदिप वर्पे यांनाही 2019-2020 या वर्षासाठीचा राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

———————————

क्वोट –

संगमनेर पंचायत समितीला सातत्याने विविध पुरस्कार मिळत आहेत. या कामांमध्ये समितीच्या सर्व विभागांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यशवंत पंचायतराज अभियानाच्या निकषांनुसार त्यांना ठरवून दिलेल्या उद्दिष्ट पूर्ततेबाबत प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यामध्ये सांघिकरित्या उत्तम कामगिरी केली आहे. म्हणूनच हे यश सांघीक आहे.

अनिल नागणे,गट विकास अधिकारी

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!