गुन्हेगारीब्रेकिंग न्युज

आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक अमित पंडित यांना अटक..

राजकीय, व्यापारी क्षेत्रासह सहकार क्षेत्रात खळबळ

आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक अमित पंडित यांना अटक

राजकीय, व्यापारी क्षेत्रासह सहकार क्षेत्रात खळबळ

संगमनेर(प्रतिनिधी)-

अहमदनगर येथील अर्बन बँकेच्या 261 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची नाळ संगमनेर तालुक्यातील आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक असलेले अमित पंडित यांच्याशी जोडली गेल्याने संगमनेर शहर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याच घरात लपून बसलेल्या पंडितला अटक केल्यामुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अमृत वाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक केल्याने संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रासह उद्योजकांमध्येही खळबळ उडाली आहे. 110 वर्षांची परंपरा असलेली अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या बँकेच्या घोटाळ्यात संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक असलेले अमित पंडित यांच्या मागे पोलीस अनेक दिवसांपासून होते. अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांना अटक करण्याचे आदेश दिले असल्याने संगमनेर शहर पोलीस त्यांचा मागोवा घेत होते. मात्र पंडित कुठेही मिळून आले नाही.

शनिवारी (दि 16) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंडितच्या घरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, आणि हरिश्चंद्र बांडे यांच्या पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता ते कुठेही मिळून आले नाही. मात्र त्यांच्या बेडरूममध्ये पोलिसांनी झडती घेतली असता दडून बसलेला अमित पंडित सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रासह व्यापारी तसेच सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!