“त्या” पीडित विद्यार्थिनींची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल….
युनिक न्यूज च्या बातमीची घेतली दखल
“त्या” पीडित विद्यार्थिनींची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल….
संगमनेर (दि 18)-
“युनिक मराठी न्यूज च्या वृत्ताची “त्या” पीडितेच्या वृत्ताची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदर प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
तालुक्यातील पठार भागातील एका गावात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने हात व तोंड बांधून एका नराधमाने चार मित्रांच्या मदतीने तिच्यावर दोन वेळा पाशवी अत्याचार केला होता. याबाबत त्या पीडितेने घरी जाऊन तिच्या आईला या बाबत घडलेली हकिकत सांगून या घटनेचा मानसिक धक्का बसल्याने विष प्राशन करून जीवन संपविले. याबाबत तिच्या आईने रविवारी रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार बाल लैगिंक अत्याचारा सह विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करून त्या पाच ही जणांना अटक केली आहे.
घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा असे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संगमनेर पोलीस उपअधीक्षक यांना निर्देश दिले आहेत.
तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावी. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर आरोपींकडून मुलीच्या पालकांवर वारंवार दबाव आणला जातो आहे त्यामुळे तिच्या पालकांना त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे. तसेच वेळप्रसंगी संरक्षण देण्यात यावे. या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले. सदर घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान या गंभीर घटनेची युनिक मराठी न्यूजने बातमी प्रसिद्ध करताच गंभीर पडसाद तालुक्यासह राज्यात उमटले असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने लक्ष घालून संगमनेर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याशी दूरध्वनी वर संपर्क साधला असून तपासाबाबत कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात जलद कार्यवाही होण्याची आशा निर्माण झाली आहे.
तसेच यामुळे पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.