साकुर घटनेची चौकशी होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशन कडून तीव्र निषेध..
साकुर घटनेची चौकशी होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशन कडून तीव्र निषेध..
संगमनेर (प्रतिनिधी)-
साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
साकुर येथे अल्पवयीन असलेल्या इयत्ता दहावीच्या मुलीवर झालेली अत्याचाराची घटनाही अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून यातील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. याचबरोबर या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून यातील कोणत्याही आरोपींना जामीन मिळता कामा नये. तसेच यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा झाली पाहिजे.
याचबरोबर या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना शासनाकडून संरक्षण मिळावे व तसेच त्यांना मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळावी अशी मागणी संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात व जयहिंद महिला मंच आणि एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली असून या घटनेची त्वरित चौकशी व्हावी याकरता प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
साकुर येथील घटनेने संपूर्ण संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून यातील आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरांमधून होत आहे