Uncategorized
शिवसेना(उबाठा.)ने आपल्या 17 उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीवर आ. थोरात नाराज!
संजय राऊतांची आ. थोरातांची त्या भेटीचे नेमके गूढ काय.?
शिवसेना(उठाबा.)ने आपल्या 17 उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीवर आ. थोरात नाराज!
उद्धव ठाकरे यांनी त्या यादीचा पुनर्विचार करावा असे केले आवाहन..
संजय राऊतांची आ. थोरातांची त्या भेटीचे नेमके गूढ काय.?
संगमनेर(प्रतिनिधी)-
महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी प्रतिक्षेतच होती. त्यात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली खरी मात्र महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब यांनी थेट उद्धव ठाकरे यांनी यादीचा पुनर्विचार करावा असे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये काही जागांवर मतभेद आहेत. असे असताना उद्धव ठाकरे यांनी अशी यादी जाहीर करणे योग्य नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
आघाडी धर्म म्हणून काही गोष्टींची काळजी ही तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. मात्र, दुर्दैवाने अशा प्रकारची काळजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने घेतली नसल्याचे दिसते, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काही जागांचा आमचा आग्रह आहे. आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत विश्वजीत कदम हे दिल्लीला गेले आहेत. याबाबत आम्ही देखील दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. त्यामुळे विश्वजीत कदम देखील इथली वस्तूस्थिती कळवतील, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत यावे, असा आग्रह आमचा सातत्याने राहिला आहे. देशाचा इतिहास एक वेगळ्या पद्धतीच्या वळणावर आहे. अशावेळी एक विचाराच्या असलेल्या सर्वांनी एकत्र राहणे आवश्यक आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत यावे यासाठी आम्ही मनापासून पुढाकार घेतला होता. मात्र, आता त्यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी यावर एकत्र बसून चर्चा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
अजूनही वेळ गेलेली नाही. तरी देखील उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीला आमचे आवाहन आहे की, त्यांनी याचा पुनर्विचार करावा. ही काळाची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस कायमच एकत्रित राहण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. असे असतानाही बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांना पुनर्विचार करण्याचा आग्रह केला आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या गटाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवाराला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरे गटाने जो उमेदवार दिला आहे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. खिचडी सप्लायर करून त्यांनी दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपले जात आहे. मात्र, मी खिचडी चोराचे काम करणार नाही. या संदर्भात मी आत्ताच घोषणा करत असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले. इतकच नाही तर माझ्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत. आठवडाभरात मी मोठी घोषणा करू शकतो, आता आरपारची वेळ आली असल्याचे देखील संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांची आ. थोरातांची त्या भेटीचे नेमके गूढ काय.?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली 17 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त करत थेट उद्धव ठाकरे यांनी यादीचा पुनर्विचार करावा असे आवाहन केले आहे. परंतु दोन ते तीन दिवसांपूर्वी शिवसेना(उबाठा) नेते संजय राऊत हे थेट हेलिकॉप्टर ने संगमनेर मध्ये आमदार बाळासाहेब थोरातांच्या गृही आले होते. यावेळी राऊतांची कन्या देखील त्यांच्या सोबत आली होती. मात्र या भेटीची साधी भनक देखील माध्यमांना लागली नाही. थोरातांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल केल्यानंतर माध्यमांना माहीत झाले. मग राऊतांची संगमनेरमध्ये आ. थोरातांशी थेट भेट नेमकी कशासाठी होती.? याचे गौडबंगाल गुलदस्त्यातच आहे. परंतु ठाकरे गटाच्या 17 उमेदवारांच्या यादीवर आ. थोरातांनी थेट नाराजी व्यक्त केल्याने त्या बैठकीचे फलित नेमके काय झाले याचे गूढ कायम आहे.