Uncategorized

संगमनेरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी..

शिस्त पाळून शिवजयंती साजरी केल्याबद्दल शिवप्रेमी, शिवसैनिक व शिवभक्तांचे मानले अमर कतारी यांनी आभार..

संगमनेरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी;
शिस्त पाळून शिवजयंती साजरी केल्याबद्दल शिवप्रेमी, शिवसैनिक व शिवभक्तांचे मानले अमर कतारी यांनी आभार..
संगमनेर(प्रतिनिधी)-
तिथीनुसारची शिवजयंती संगमनेर मध्ये मोठया उत्साहात साजरी झाली. गेल्या काही दिवसांपासून दोन गटातील वादांवादीमुळे संगमनेर मध्ये तणावपूर्ण निर्माण झाले होते. मात्र शिवप्रेमींनी पाळलेली शिस्त व पोलीस प्रशासनाने ठेवलेला चोख बंदोबस्ताने शिवजयंती उत्साहात व शांततेत पार पडली.
तिथीनुसार पारंपारिक शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्याची प्रथा संगमनेरात गेल्या अनेक वर्षापासून पाळली जाते. शिवजयंती युवक उत्सव समिती, संगमनेर शहर शिवसेना प्रणित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, रंगारगल्ली शिवसेना शाखा तसेच उपनगरातील मंडळांनी मोठ्या उत्साहात दिवसभर विविध कार्यक्रम व उपक्रमे राबवून शिवजयंती साजरी केली.  यावर्षीच्या शिवजयंतीला संगमनेर शहरात घडलेल्या तणावपूर्ण घटनांची पार्श्वभूमी व पोलीस प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे केलेले नियोजन आणि संवेदनशील असलेले वातावरण पाहता शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस आणि अमर कतारी संस्थापक हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीला अधिकृतपणे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती. परवानगी दिल्यावर देखील शिवसेना संगमनेर शहराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती मुख्य मिरवणुकीत सहभागी करण्यासाठी  शहर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरला पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ यांना मिरवणुकीत मानाचे पहिले स्थान दिले व त्यानंतर संगमनेर शहर शिवसेनेच्या मिरवणुकीला दुसरे स्थान देऊन सामंजस्याने  वाद मिटवला हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या मिरवणुकीत सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांना मानसन्मान देण्यात आला व मिरवणूक शांततेत पार पडली.
     दुपारी भव्य अश्या बाईक रॅलीची सुरुवात चंद्रशेखर चौकातून झाली शहर व तालुक्यातील शेकडो युवक ह्या रॅलित सहभागी झाले होते. तर पारंपरिक शिवजयंती मिरवणूक संगमनेर नगरपालिकेपासून सायंकाळी पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, प्रांताधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळासोबतच संगमनेर शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट दोन्ही गट आणि उत्सव समिति सहभागी झाली होती. प्रचंड जल्लोषात मिरवणूक पार पाडली. यावेळी बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमर कतारी, विद्यमान अध्यक्ष त्रिलोक कतारी, भाऊसाहेब हासे, अमित फटांगरे, प्रथमेश बेल्हेकर, संभव लोढा, प्रशांत खजुरे, अमित चव्हाण, दीपक साळुंखे, विजू सातपुते, राजू सातपुते, गोविंद नागरे, अमोल डुकरे, अमोल कवडे, महिला आघाडीच्या संगीता गायकवाड, आशा केदारी, रेणुका शिंदे, शिवसेनेचे आप्पा केसेकर, जालिंदर लहांगे, योगेश बिचकर, शिंदे गटाचे रमेश काळे, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष सागर बागे, मोटरसायकल रॅली प्रमुख साजन कातारी, पप्पू नेहुलकर, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, सागर कतारी, मयूर जाधव, अविनाश सामल, मंगेश सालपे, कपिल टाक, मनीष माळवे, कल्पेश बोगुल, नरेश माळवे, आप्पा पवार, तेजस केनेकर, शुभम आमले, रोहित वाळके, व इतर अनेक सामाजिक संघटनाचे शिवभक्त पदाधिकारी उपस्थित होते.
adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!