गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या प्रकरणात 300 नागरिकांवर गुन्हा दाखल
गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या प्रकरणात 300 नागरिकांवर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
संगमनेर/प्रतिनिधी-
स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप फोडून आमच्या हक्काचे धान्य चोरून नेल्याचा आरोप करत दुकानदार गुंजाळ व पुरवठा निरीक्षक यांनी संगनमताने हे दुकान फोडल्याचा आरोप करत तहसील कार्यालयात जमा झालेल्या 250 ते 300 नागरिकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल गुंजाळ (रा गुंजाळवाडी), रमेश किसन नागरे (रा शेडगाव, ता संगमनेर), अनिल गुंजाळ, सुयोग गुंजाळ, नैना कैलास रहाणे, किसन दत्तू गुंजाळ, (रा गुंजाळवाडी) आणि 250 ते 300 इतर कार्यालयात येऊन कामकाज करत असताना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागा समोर आले व “तुम्ही विलास आबाजी गुंजाळ यांना स्वस्त धान्य दुकान पूर्ववत करणे बाबतचा आदेश का दिला” या कारणावरून सर्वांनी भालेराव यांना घेराव घालून गैर कायद्याची मंडळी जमा करून धक्का बुक्की करून दमदाटी केली. याप्रकरणी भादवि कलम 353, 323, 143, 147, 149, 506, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा 1951 चे कलम 37(1)(3)/135 प्रमाणे तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.