उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके आमदार थोरातांच्या भेटीला..
मध्यरात्रीच्या भेटीत रंगल्या प्रदीर्घ राजकिय चर्चा..
उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके आमदार थोरातांच्या भेटीला..
मध्यरात्रीच्या भेटीत रंगल्या प्रदीर्घ राजकिय चर्चा..
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) या पक्षाच्यावतीने उमेदवारीची तुतारी फुंकल्यानंतर, पारनेर तालुक्याचे युवा आमदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील सुदर्शन या निवासस्थानी शनिवार ( ता. ३० ) रोजी रात्री सदिच्छा भेट घेतली. यावेळी राहुल झावरे, डॉ. जयश्री थोरात उपस्थित होत्या.
यावेळी माध्यमांसमोर बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या सुसंस्कारी राजकारणी नेत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत. त्यांच्याविषयी राजकिय नेत्यांना आत्मियता आणि यांनी आदर वाटतो. २०१९ च्या विधानस भा निवडणूकीनंतर त्यांनी विधानमंडळाच्या कामकाजात माझ्यासारख्या नवख्याला सातत्याने मदतीचा हात दिला. नवीन आमदारांना त्यासातत्याने मदत व मार्गदर्शन करणारे थोरात हे लोकप्रिय नेते आहेत. राजकारण व समाजकारणातील नवीन पिढीसाठी त्यांचा आशीर्वाद अत्यंत महत्वाचा असल्यान त्यांच्या भेटीसाठी आवर्जून आल्याचे लंके म्हणाले.
तर आमदार थोरात म्हणाले की, निलेश लंके यांची आमदारकीची कारकिर्द यशस्वी व लोकप्रिय राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा, धावपळ करणारा कार्यकर्ता आशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेवून सातत्याने काम करणारे, हे नेतृत्व आहे. सामान्य जनता व युवकांची त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. मगर दक्षिणेत मोठ्या उमेदवाराशी दोन हात करणारा हा कार्यकर्ता लहान असला तरी गुणी आहे. श्रीमंत विरुद्ध गरीबाच्या या लढाईत निलेश लंके यशस्वी होतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे. हे यश महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचे राहणार असल्याचेही थोरात म्हणाले.