
कसायांना वाचवण्यासाठी प्रशासनाची खटाटोप?
मुख्य आरोपी मोकाट?
संगमनेर
काही दिवसांपूर्वी कोल्हेवाडी रस्त्यावर झालेल्या मारहाणीत अवैध कत्तलखाने कसाई होते. ही बाबत उघड झाली असली तरी कसायांचे कुकर्म सुरूच आहे. याला जबाबदार स्थानिक प्रशासन आहे. त्या घटनेतील मुख्य आरोपी संमत कुरेशी हा अजूनही संगमनेरमध्ये मोकाट फिरत असल्याची माहिती मिळाली असून हा आरोपी एका बड्या कसायाचा भाऊ असल्याने त्याला अभय मिळत असल्याचे कसायांमध्ये चर्चा आहे.
संगमनेर शहरातील वातावरण अशांत करण्यामागे अवैध धंदे करणारे असल्याने त्यांचे पायमुळं खोदून काढण्याची गरज आहे. अनेक वेळा शहरात दोन समाजात तेढ निर्माण झाला. याची झळ दोन्ही समाजात बसली. संगमनेरहुन कोल्हेवाडी येथे आपल्या घरी जात असताना तसेच सोबत दोन छोट्या मुली बसलेल्या असताना काही समाजकंटक यांनी किरकोळ कारणावरून त्या व्यक्तीला मारहाण केली. सोबत असलेल्या मुलींचाही विचार केला नाही. हीच बाब त्यांच्या समजातील नागरिकांनाही वाईट वाटले. परंतु यामुळे शहरातील सामाजिक वातावरण दूषित होऊन दोन समाजात तेढ वाढवला गेला. असले प्रकार कसायांमुळे होत असतात हे जगजाहीर असले तरी त्यांचा मुळापासून खात्मा झालेला नाही. त्या बड्या कसायाने छोटे-छोटे कसाई संपवून स्वतःच डॉन बनण्याचे स्वप्न पाहत आहे.
कोल्हेवाडी रस्त्यावरील झालेल्या घटनेतील मुख्य आरोपी संमत कुरेशी हा एका मोठ्या कसायाचा भाऊ असल्याने तो राजधानीत जाऊन राहू लागला. परंतु प्रशासनातील काहींना त्याचा पत्ता सापडला आणि त्याला संगमनेरात आणण्याचे ठरवले मात्र यातही आर्थिक तडजोड होऊन तो संगमनेर शहरात आला. आणि मुक्त संचार करू लागला. त्याला राजधानीत आणण्यासाठी एक बिना नंबरची पांढऱ्या रंगाची गाडी गेली होती. मात्र आर्थिक तडजोड झाल्याने त्याला सोडून दिले. त्यामुळे आता तटाला कुणाचीही भीती राहिली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्या बड्या कसायाबरोबर त्याचा भाऊ याला अटक करून शहरातील शांतता कायम ठेवण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.
शहरातून मोठे आयशर भरून आजही बाहेर जात आहेत. यात छोटे व्यावसायिक बोलायला गेले तर त्यांच्यावरच कारवाया केल्या जातात. त्यामुळे आतातर त्यांनीही हाताची घडी तोंडावर बोट ठेवणे शहाणपणाचे ठरवले आहे. तर कसाई (कुरेशी) आहेत मग आरोपी शेख, पठाण, खान सय्यद यांना नाहक अडकवून दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.