स्वतःला देशातील काँग्रेसचे मोठे नेते समजता जिल्ह्यात दुर्दैवाने एक जागा काँग्रेससाठी आणता आली नाही- महसूलमंत्री विखे पाटील.
स्वतःला देशातील काँग्रेसचे मोठे नेते समजता जिल्ह्यात दुर्दैवाने एक जागा काँग्रेससाठी आणता आली नाही- महसूलमंत्री विखे पाटील.
संगमनेर(प्रतिनिधी)-
देशातील राज्यातील स्वतःला काँग्रेसचे मोठे नेते समजतात पण दुर्दैवाने जिल्ह्यात एक जागा काँग्रेस च्या वाट्याला आणता आली नाही. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी तुमचे बेडगी प्रेम जनतेने पाहिले. दुसऱ्याला पक्ष निष्ठा शिकवताना तुमच्या कोणत्या निष्ठा आहेत? काँग्रेस पार साफ झाली आहे. तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन गहाण टाकला? आणि हे आम्हाला पक्षनिष्ठ शिकवता अशी जहरी टीका करत “गरीब श्रीमंतांची लढाई” असे वक्तव्य तुम्ही करता तर इथे तयारीला लागा संगमनेरमध्ये गरीब श्रीमंतांची लढाई लावू.. आपण काय बोलतो काय वक्तव्य करतो हे तरी जरा पहात जा असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार थोरातांना नाव न घेता दिला आहे.
संगमनेरमध्ये मालपाणी लॉन्स येथे संकल्प महाविजयाचा या मेळाव्यात भाजपचे स्टार प्रचारक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे, भाजपाचे तालुका प्रमुख वैभव लांडगे, शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गनफुले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपिल पवार, जावेद जहागिरदार, राहुल भोईर आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विखे म्हणाले की, संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोकात नाही यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्वतःला काँग्रेसचे देशाचे राज्याचे नेते समजताना दुर्दैवाने एक जागा महाविकास आघाडीत जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला आणता आली नाही. साकुरच्या मुलीवर अत्याचर झाला हे साधे त्या कुटुंबियांना भेटायला गेले नाहीत. त्यांचेच बगलबच्चे यात आहेत. हे त्यांना पाठीशी घालतात त्यांचे समर्थन करतात पण आम्ही यांना धडा शिकवू. या जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान आदरणीय पवार साहेबांनी केले आहे. विकासाचे रोल मॉडेल म्हणवून घेताना 100 टँकर तालुज्यात चालू आहे. हे विकासाचे रोल मॉडेल का.?जनतेला 40 वर्षे पाणी मिळाले नाही. भोजपुरचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. . सगळे ठेकेदार यांचेच. विकासाचे मॉडेल टँकरमुक्त असायला पाहिजे. कोणती योजना काँग्रेसने दिलीये असा सवाल करत फक्त घराघरात भांडण लावायचे तालुक्यात एवढेच केले.
पंतप्रधान मोदींजींनी 5 लाखांचे आरोग्यचव कवच प्रत्येक भारतीय नागरिकाला दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय.
12 कोटी 25 लाख रुपये संगमनेरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत.
या संकल्प महाविजयाचा या मेळाव्याचा महासंकल्प एकच आहे पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे. आपकी बार 400 पार.. हे मतदान राधाकृष्ण विखे किंवा लोखंडे यांना मतदान नसुन हे मतदान मोदींना आहे. भारताने नव्हे तर जगाने हे नेतृत्व मान्य केले आहे. संगमनेर तालुक्यतात 8 लाख 39 हजार 92 लाभार्थी आहेत. 460 कोटी रुपयांचे वाटप वेगवेगळ्या योजनेतून झाले आहे. आमचे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा घेऊन आम्ही काम करतोय असे पंतप्रधानांनी राष्ट्रीय अधिवेशनात सांगितले. नगरच्या दोन्ही जागा आपण घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.
उ बा ठा म्हणजे ऊब आली आहे.. काँग्रेस चा फुफाटा झाला आहे. यांना धडा शिकविण्यासाठी आदरणीय पंतप्रधान मोदीजीना निवडून द्यायला पाहिजे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आहेत. यांचा विजय म्हणजे महायुती चा विजय आहे. असे विखे म्हणाले.
यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, मोदी साहेबांना पून्हा एकदा पंतप्रधान पदी आरूढ करायचे आहे. काही लोक आरोप करता की, खासदार लोखंडे साहेब भेटले नाही मात्र काही चुका झाल्या असतील. परंतु येणाऱ्या काळात त्या चुका दुरुस्त करायचे आहे. त्यामुळे मोदी साहेबांना निवडून द्यायचे आहे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मोदी सरकारला आपल्याला पंतप्रधान पदी आरूढ करायचे आहे. लोखंडे साहेबांना निवडून द्यायचे आहे. धनुष्यबाणला तुमचे आशीर्वाद असू दया असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की,
जो जो बदल वंचीत आहे ज्या घटकाला आर्थिक सुबकता नाहीये त्या त्या घटाकला न्याय देण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे. आपल्या समोर जे विरोधक आहेत ते आमच्या वर टीका करतात महाविकास आघाडीचा पंतप्रधान चेहऱ्याचा साधा उमेदवार देखील त्यांनी जाहीर केला नाहीये. तुम्ही तुमच्या खालचा अंधार बघितला पाहिजे मग टीका केली पाहिजे. राम मंदिराचा मुद्दा हा भावनेचा मुद्दा आहे. ज्या व्यक्तीने ते पूर्ण केले त्या पंतप्रधान मोदींजींनी निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी लोखंडे साहेबाना निवडून दिले पाहिजे. महसूल खात्याची जागा उद्योजकांना देणार आहोत. या भागात नव्याने एमआयडीसी करायची असेल ती विखे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. 35 हजार उद्योजक बनविण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे. आरोप प्रत्यारोपां कडे लक्ष देऊ नका. विरोधकांपेक्षा जास्त चांगले काम करणे हे विखे साहेबांचे काम आहे. विरोधकांकडे लक्ष देऊ नका.
आचारसंहिता संपल्या नंतर सेव्हन स्टार एमआयडीसी तळेगाव दिघेला देण्याची ग्वाही देतो. असे ते म्हणाले.
यावेळी खा. सदाशिव लोखंडे म्हणाले की, महाराष्ट्रातील मी पहिला खासदार आहे ज्याने जिल्हा परिषदेचे शाळेत कॉम्प्युटर दिले पण प्रसिद्धी दिली नाही. कोरोना काळात योगाच्या रूपाने 60 नगरपंचायत मध्ये योग्य भवन बनविले. हायमॅक्स बसविले. 8 नगरपालिकेत 22 कोल्ड स्टोरेज बसविले आहे. शेतकऱ्यांसाठी 22 कोल्ड स्टोरेज दिले. शेतकऱ्यांचा शेतमाल टिकला पाहिजे यासाठी काम केले. पाणी आलं पण 2005 चा काळा कायदा झाला. घाटमाथ्याचे वाहून जाणाऱ्या पाणी योजना करणार आहोत. तो प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला. भोजपुरचा प्रश्न सोडवू. तळेगाव एमआयडीसी करू. त्यामाध्यमातून लोकांना रोजगार मिळून देऊ. मी निधी दिला पण त्याचे उदघाटन केले नाही. वाजा गाजा न करता काम केली. गावातील एखादा माणूस आला तर त्याचे काम केले. वाजवलं नाही पण आता निवडून आल्यावर वाजवणार असे वक्तव्य खासदार लोखंडे यांनी करत
मोदी साहेबांनी गोरगरीब लोकांसाठी अनेक काम केले. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मोदी सरकारने केले. 2024 ची निवडणूक आहे. मी साई बाबांची शप्पत खाणार नाही. मी साईबाबांच्या तुपात खाणार नाही. मी मांडी घालून बसू शकतो आणि त्याच्या पुढे 100 पाऊले चालू शकतो. माझ्याकडून संपर्काबद्दल ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्याबद्दल मला माफ करा. मी मतदार आणि रहिवासी श्रीरामपूर चा आहे. त्यामुळे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा. पुढील काळात चुका सुधारल्या जातील. विखे साहेबांचे मनात असेल तेच तोंडात असते. हा फरक विखे थोरातांमधील आहे. यावेळी तळेगाव दिघेला फाईव्ह स्टार एमआयडीसी मंजूर करावी अशी मागणी मंत्री सावंत यांच्याकडे लोखंडे यांनी केली.