ब्रेकिंग न्युजसंपादकीय

संगमनेरला सुंदर व स्वच्छ बनवणाऱ्या ताई

वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख...

 

संगमनेरला सुंदर व स्वच्छ बनवणाऱ्या ताई…

 

संगमनेर ( प्रतिनिधी ) ः
आपल्या देशाला  राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा थोर महिलांचा समृध्द वारसा लाभला आहे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवीत, महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेत, सबलीकरणाची चळवळ राज्यपातळीवर राबवणाऱ्या जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांचे नाव महाराष्ट्रात अग्रक्रमाने घेतले जाते. आपले वडील दिवंगत सहकार महर्षी, स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील दंडकारण्याची चळवळ राबवताना तालुकाच नव्हे तर संगमनेर शहरही हिरवाईने समृध्द करण्याचा वसा त्यांनी घेतला असून, त्याच्या परिणामस्वरुप संगमनेरची झाडांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. त्याबरोबरच स्वच्छ व सुंदर संगमनेरसाठी सातत्याने आग्रही भुमिका घेत, जनतेशी संवाद साधणाऱ्या  लोकप्रिय नगराध्यक्ष अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.
थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टी व समृद्ध नेतृत्वात जोर्वे गावातील संतसावलीत काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते, आमदार बाळासाहेब थोरात व सौ. दुर्गाताई तांबे यांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे बंधु आमदार बाळासाहेब थोरात अतिशय समर्थपणे राज्यात प्रभावी काम करत आहेत तर सौ.दुर्गाताई तांबे उत्तर महाराष्ट्रात महिला चळवळीच्या नेत्या म्हणून काम करत आहेत. नाशिक पदविधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ राज्यात निरोगी व निकोप समाज निर्मीतीचे काम करत आहे. यातील महिला सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या जय हिंद महिला मंचची धुरा दुर्गाताईंनी समर्थपणे सांभाळली आहे.
हरित सृष्टीसाठी दंडकारण्य अभियान चळवळ
मानवाची जमिनीची वाढती गरज व अमर्याद हाव यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करीत सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. या कठीण परिस्थितीत संगमनेर तालुक्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मा. महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात व मा.आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान चळवळीचा धडक कार्यक्रम प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी राबवला. पावसाचा लहरीपणा, वाढते तापमान, कडक उन्हाळा, ग्लोबल वार्मिंग यामुळे ढासळणाऱ्या निसर्गाच्या पर्यावरण संतुलनावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हाच समर्थ व एकमेव पर्याय असल्याची जाणीव झाल्याने त्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे व्रत घेऊन, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा ) यांनी दंडकारण्य अभियानाची २००६ साली सुरुवात केली. आजही दरवर्षी ते अभियान जोरदार राबवले जात असून, वृक्षारोपणाची ही चळवळ जनतेच्या सक्रीय सहभागामुळे लोकचळवळ झाली आहे.
महिला बचत गटाद्वारे महिला सबलीकरण
१९९८ मध्ये जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून सुरु झालेल्या या चळवळीत आजमितीस तालुक्यात चार हजार महिला बचत गट कार्यरत आहेत. दुर्गाताईंच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी मागील २५ वर्षांपासून आरोग्य शिबीरे, महिला मेळावे, व्यायाम मार्गदर्शन शिबीरे, क्रिडा, सांस्कृतिक स्पर्धा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या पिशव्या, खाद्य पदार्थ, काजू प्रक्रिया उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली असून, महिला पतसंस्था व महिलांचा पुढाकार तसेच सहभाग असलेल्या दुग्ध व्यवसायाची उभारणी झाली. बचत गटांमार्फत विविध रोपवाटिका, गरीब व गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, आरोग्य विमा अशा अनेक सुविधा दिल्या जातात. या सर्व कामांसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे.
संगमनेर हे झाडांचे शहर
संगमनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करतांना संगमनेर शहराला स्वच्छ, सुंदर व हरित करतांना हे शहर ग्रीन सिटी, गार्डन सिटी करण्याचा प्रयत्न दुर्गाताईंनी केला आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देतानाच, शहर विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे संगमनेर शहर हे देशातील प्रगतशील व स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात आहे. स्वच्छतेबरोबरच शहरात २५ बगीचे, ओपन जीम, नागरिकांसाठई जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आले. पर्यावरणासाठी हवा स्वच्छ रहायला हवी याकडे ताईंचे कायम लक्ष आहे. शहरात खूप मोठया संख्येने वृक्ष लागवड व संवर्धन केले जात असल्याने संगमनेर हे झाडांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे.
विकासातून वैभवाकडे वाटचाल
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी थेट निळवंडे धरणातून आणलेल्या पाईप लाईनच्या स्वच्छ व मुबलक पाण्याबरोबर मागील काळात सतत झालेल्या विकास कामांमुळे संगमनेर शहर हे राज्यात प्रगतशील म्हणून ओळखले जात आहे. सुसज्ज विमानतळाचा आभास करुन देणारे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले हायटेक बसस्थानक, अद्ययावत प्रशासकिय इमारती, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराबाहेरुन जाणारा बाह्यवळण रस्ता, भूमिगत गटारे, क्रिडा संकूल, विविध रस्ते, बागा, जॉगिंग ट्रॅक, वाचनालये, इंजिनीअरींग कॉलेज ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या नाशिक पुणे राज्यमार्गाचे चौपदरीकरण याचबरोबर शहराला जोडणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभिकरण यामुळे शहराची वैभवाकडे वाटचाल सुरु आहे. आता नव्याने बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ भव्य पुतळ्यालाही हिरवा कंदिल मिळाला आहे.
जनतेत रमताना, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या दुर्गाताई
शहरातील जनतेच्या आग्रहामुळे सुमारे दिडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या प्रथम महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या लोकाभिमुख कामाचा राज्यपातळीवर गौरव झाला. त्यात बुलढाणा येथील स्व. विलासराव देशमुख प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार, फिलीवस फौंडेशनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, तेजस्वीनी पुरस्कार, वीरभारती पुरस्कार, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान पुणे पुरस्कार, डॉ.बाबा आमटे, यशवंत वेणू आदींसह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी ताईंचा गौरव झाला आहे. दररोज सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत जनसंपर्कात राहतांना लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ताई करत असतात. शहरातील प्रत्येक घरातील नागरिकाला त्या नावानिशी ओळखतात. इतकेच नव्हे तर त्याच्या घराच्या परिसरात असलेल्या वृक्षांचीही त्यांना माहिती असते. राजकारणापेक्षा समाजकारणात रमणाऱ्या ताईंनी नित्य वाचन व साहित्याची आवडही जपली आहे. ग्रामीण भागातील जात्यावर गायल्या जाणाऱ्या पारंपरिक ओव्यांचा काव्यसंग्रह, गाणी दंडकारण्याची, शिदोरी गितांची आदि पुस्तकांचे संपादनही त्यांनी केलेले आहे. त्यांचा वाचनाचा दांडगा व्यासंग त्यांच्या भाषणातून साधलेल्या सहज संवादामुळे स्पष्ट होतो. प्रत्येक काम नव्याने हाताळण्याची अनोखी पद्धत व तल्लख स्मरणशक्ती यामुळे ताईंचे काम लोकप्रिय ठरत आहे.
हरितसृष्टीसह स्वच्छ व सुंदर संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या सौ. दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसानिमीत्त अमृत उद्योग समूहाच्यावतीने हार्दीक शुभेच्छा !!

 

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!