ब्रेकिंग न्युजराजकीयराज्य

सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…

मंत्री राधाकृष्ण विखेंच्या आव्हानावर आमदार थोरातांचे प्रतिआव्हान

संगमनेर ( प्रतिनिधी ) ः गेल्या काही दिवसात राज्याच्या आजी व माजी महसूल मंत्र्यांमधील वाद व एकमेकांवर केलेली टिका अधिकाधिक उग्र रुप धारण करु लागली आहे. तलाठी भरती अत्यंत पारदर्शक झाल्याचे सांगत, भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण आढळल्यास आपण राजकारणातून बाजूला होऊ.. आरोप सिध्द न झाल्यास तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा असे आव्हान राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले होते. याबाबत आमदार थोरात यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर तुमचे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हज को… असे झाल्याची खोचक व खरमरीत टिका केल्याने या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील शाब्दिक युध्द विकोपाला जात असल्याचे दिसते आहे.
अहमदनगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देताना मंत्री विखे यांनी तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे म्हटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि थोरात यांनी या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत भाष्य करताना विखे पाटील यांनी भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले होते. या आव्हानाचा समाचार घेताना आमदार थोरात यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत महसूल मंत्री विखे यांना “तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को… असे झाले आहे.” असे म्हणत पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.
राज्याच्या राजकारणात विखे व थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रृत आहे. काँग्रेस पक्षात एकत्र काम करतानाही त्यांच्यातील कुरघोड्यांचे राजकारण सुरुच होते. राज्याच्या बदलय्ता राजकिय समिकरणात राधाकृष्ण विखे पाटलींनी थेट पक्षबदल करताना ज्यांच्या विरोधात ाजवर काम केले त्या भारतीय जनता पक्षाला जवळ करीत राजकारण, प्रेम आणि युध्दात सर्वकाही शक्य असल्याचा प्रत्यय दिला होता. या बदलानंतर त्यांच्यातील राजकिय वैराला थेट विरोधकांची किनार लाभल्याने हे वैर अधिकच तीव्र रुप धारण करु लागले आहे. लोकसभा निवडणूकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा नगर दक्षिणेतील पराभव जिव्हारी लागल्याने, आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर मंत्री विखे पाटील यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळे थेट संगमनेर शहर किंवा तालुक्यातील गावांमधील सार्वजनिक कार्यक्रमातही थोरातांचा समाचार घेण्याची एकही संधी ते चुकवीत नाहीत. त्यामुळे विखे पाटील यांनी नुकतेच नगर येथील कार्यक्रमात दिलेल्या आव्हानाचा समाचार थोरातांनी समाज माध्यमावरील एक्स अकाउंटवर घेत त्यांना प्रतिआव्हान दिले आहे.
——————————
आमदार बाळासाहेब थोरात म्हणतात –
महसूलमंत्री @RVikhe Patil तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठवला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांची अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल.
बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को… असे झाले आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो. असे देखील थोरात यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!