चांगल्या कामामुळे संगमनेरचे राज्यात कौतुक– आ. थोरात
कारखाना येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ
चांगल्या कामामुळे संगमनेरचे राज्यात कौतुक– आ. थोरात
कारखाना येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ
संगमनेर ( प्रतिनिधी)–वारकरी संप्रदायाला हजारो वर्षाची परंपरा असून लहान मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्व धर्म समभाव जोपासला जातो. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श शिस्तीवर संगमनेर तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू असून येथील सहकार, शिक्षण , समृद्ध बाजारपेठ चांगले वातावरण विकासाची कामे आणि सुसंस्कृत राजकारण यामुळे संगमनेर तालुक्याचे राज्यभरात कौतुक होत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले असून अध्यात्मामुळे सर्वांना सुंदर अनुभूती मिळत असते असे म्हटले आहे
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या घटपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ कांचनताई थोरात, चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, उपसभापती नवनाथ आरगडे, रामदास पा वाघ ,हौशीराम सोनवणे, भास्करराव आरोटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, हरिभक्त परायण गोविंद महाराज करंजकर, हरिभक्त परायण चंद्रलेखाताई काकडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, संदीप दिघे ,अशोक कवडे ,ॲड. शरद गुंजाळ आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवर संगमनेरचा सहकार काम करतो आहे . गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने काम करत आहोत.येथील राजकारण, संस्कृत वातावरण , शेती सहकार समृद्ध बाजारपेठ याचबरोबर सततच्या कामातून संगमनेर चे नाव राज्यात घेतले जात आहे.
आपण राज्य पातळीवर संगमनेरचा सन्मान वाढेल असेच कायम काम केले. तालुक्यातील लोकांनी खूप प्रेम दिले. ही परंपरा आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे.
एक कुटुंब म्हणून आपला तालुका असून दरवर्षी कारखान्याच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने सप्ताहाचे आयोजन होते. पसायदानामध्ये सर्व जगाचा सार असून अध्यात्म मधून सुंदर अनुभूती मिळत असते. चांगले जीवन जगण्यासाठी आर्थिक समृद्धीला अध्यात्माची जोड मिळाली तर जीवनाला मोठा आनंद प्राप्त होतो असे ते म्हणाले
तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या या सप्ताहाचे हे 39 वे वर्ष आहे. अत्यंत मोठ्या भक्ती भावाने सर्वजण एकत्र येत असून श्रावण महिन्यामध्ये अमृतेश्वर प्रांगणात प्रति पंढरपूर निर्माण झाले आता असे वातावरण तयार होते असेही ते म्हणाले