आपला जिल्हाराजकीय

योजनांसाठीचे पैसे जनतेचे आहे, महायुतीचे नाही ः दुर्गाताई तांबे

महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला लाचार होणार नाहीत

संगमनेर ( वा ) ः संत व समाजसुधारकांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राने महिलांचा सदैव सन्मान केला आहे. मात्र महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून, महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा जनतेचा आहे. महायुतीचा नाही. आमदार रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केली आहे. संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात महायुतीने महिलांचा अपमान केला आहे. महिला भगिनींना देऊ केलेले पंधराशे रुपये महायुतीचे नसून जनतेच्या कष्टाचे आहेत. निवडणुका जवळ आल्याने अनेक फसव्या घोषणा केल्या जात आहेत. व्यासपीठावर मंत्र्यांच्या उपस्थितीत पैसे परत करण्याची बेताल वक्तव्ये सत्ताधारी आमदारांनी करणे ही दुर्दैवी बाब असली तरी, यांच्या मनातील आता ओठावर येऊ लागले आहे. राणा दांपत्य हे प्रसिद्धीसाठी नेहमी अशी बेताल वक्तव्य करत असतात. राज्यात प्रचंड महागाई वाढली आहे. भाजीपाला महाग झाला आहे. बेरोजगारी वाढली आहे. या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष वळवण्यासाठी अमिषे दाखवली जाण्याचे गलिच्छ राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. या वक्तव्याचा सर्व महिला भगिनी तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व स्वाभिमानी महिलांची माफी मागावी अशी मागणी ही त्यांनी केली. मिलिंद कानवडे म्हणाले की, महायुतीचे सरकार घटनाबाह्य आहे. त्यांची लोकप्रियता कमी होत असल्याने ते घोषणाबाजी करत आहेत. विकास कामे थांबवून केवळ घोषणांनी काही फरक पडणार नाही.
या वेळी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, सुरेश थोरात, निखिल पापडेजा, अर्चना बालोडे, पद्मा थोरात, मीनाक्षी थोरात, प्रमिला अभंग, दिपाली वर्पे, मीना थेटे, प्राजक्ता घुले, शितल उगलमुगले, ओमकार बिडवे, शुभम घुले, गौरव डोंगरे, जावेद शेख, तानाजी शिरतार, आनंद वर्पे, मीराताई शेटे, बेबी थोरात, निर्मला राऊत, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, एकनाथ श्रीपाद, अलोक बर्डे, अमित गुंजाळ आदींसह युवा काँग्रेस व महिला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————————————–
चौकट ः निवडणुका जवळ आल्याने महायुती सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या आहेत. रवी राणांसह इतर आमदारही मते न दिल्यास पैसे परत घेऊ अशी बेताल वक्तव्ये करत आहेत. लोकशाहीमध्ये उघड उघड मते खरेदी करण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामुळे महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला भगिनींचा अपमान झाला आहे. ः डॉ. जयश्री थोरात ( युवक काँग्रेस अध्यक्ष )

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!