लाडक्या बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी अडवणूक केली तर बँकांवर कारवाई करू – डॉ.नीलम गोऱ्हे
अहमदनगरमध्ये लाडकी बहिण सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन...
लाडक्या बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी अडवणूक केली तर बँकांवर कारवाई करू – डॉ.नीलम गोऱ्हे
अहमदनगरमध्ये लाडकी बहिण सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन…
अहमदनगर(२२ ऑगस्ट)-माननीय मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान योजेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे.
यानिमित्ताने अहमदनगर मधील टिळक रोड वरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय इथे मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली.
याप्रसंगी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचा अहमदनगर शिवसेनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजेनचा फायदा व्हावा हा सरकारचा हेतू आहे,या योजेनेचा प्रसार व्हावा म्हणून शिवसेना नेत्या व डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून माहितीचा रथ मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेला आहे.
या रथाचे माध्ममातून यावेळी अहमदनगरवासियांमध्ये जनजागृती करण्यात आली.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सरकार तुम्हाला भीक देत नसून, तुमच्या कष्टातून हे राज्य उभ राहील आहे,याच कष्टाचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला हे पैसे मिळत आहेत, ही भीक नसून हा तुमचा अधिकार असल्याचे यावेळी बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कार्यक्रमात सांगितले.
लाडक्या बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी तुमची अडवणूक केली तर बँकांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा यावेळी बोलताना डॉ.गोऱ्हे यांनी बँकांना दिला.
तसेच महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी महिलांना कार्यक्रमात दिला.
यावेळी कार्यक्रमाला मा.महापौर.श्रीमती शीलाताई शिंदे, संपर्कप्रमुख श्रीमती उज्वला भोपळे, जिल्हाप्रमुख डॉ.शबनम इनामदार, जिल्हाप्रमुख श्रीमती.मीरा शिंदे, जिल्हाप्रमुख श्री.अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख श्री.बाबूशेठ टायरवाला व इतर तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी , महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.