शिर्डीत व्हाईस ऑफ मीडियाचे शनिवारी शिखर राज्यस्तरीय अधिवेशन
शिर्डीत व्हाईस ऑफ मीडियाचे शनिवारी शिखर राज्यस्तरीय अधिवेशन
शिर्डीच्या पावनभूमीत भरणार दोन दिवस पत्रकारांचा मेळा
संगमनेर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांची एकमेव संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे २ दिवसीय राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथील साईबाबाच्या पावन भूमीत शनिवार दि३१ ऑगस्ट व रविवार दि१ सप्टेंबर २०२४ होत अस ल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी दिली
शिर्डी येथील साई पालखी निवारा या ठिकाणी होणाऱ्या दोन दिवसीय व्हाईस ऑफ मीडियाच्या शिखर अधिवेशनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांच्या हस्ते तसेच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित विधान परिषद सदस्य आ सत्यजित तांबे माजी खासदार हेमंत पाटील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ संजय मालपाणी वनंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभा पती हेमलता शितोळे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम पाचपुते अतिथी उपस्थित राहणार आहे तसेच व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सर चिटणीस चंद्रमोहन पोपला राष्ट्रीय कार्या ध्यक्ष संजय आवटे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ आदी मान्य वर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
या शिखर अधिवेशनात दै लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत भाऊ तोरसेकरज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे जेष्ठ संपादक तुळशीदास भोईटे महिला संपादकश्रीमती सरिता कौशिक यांना यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त संपादकांची मुलाखत जेष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी आणि विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे हे घेणार आहे
आम्ही घेतोय पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी या विषयावरती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख ओमप्रकाश शेटे आरोग्य सहाय्यता निधी मंत्रालय कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक हे सहभागी होऊन पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहे. त्या नंतर पत्रकारांच्या आरोग्यासाठी विशेष कार्य करणाऱ्या लातूर परभणी व बार्शी या शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.माझा जिल्हा माझे व्हिजन या विषयावर सर्व जिल्हाध्यक्ष सहभागी होणार आहे अधिवेशन घेण्या मागची भूमिका आणि नियोजित कार्य प्रणाली सर्व राज्य कार्यकारिणी आणि विभाग प्रमुख सहभागी होणार आहे त्यात राष्ट्रीय अध्यक्ष सोशल मीडिया विंग गगन महोत्रा उर्दूचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती मोहम्मद अरुण नवी रेडिओ विंग राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख आरोग्य सेलचे प्रमुख भिमेश मुतुला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष टीव्ही विंग विलास बडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष साप्ताहिक रोहित जाधव महाराष्ट्र प्रभारी महिला विंग शेख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेडिओ विंग इरफान सय्यद आणि उर्दू प्रदेशाध्यक्ष मुझतबा फारूक हे या चर्चा सत्रात सहभागी होणार आहे
दुसऱ्या दिवशी कोअर कमिटी प्रमुख संजय पडवळ हे ठरावाचे वाचन करणार आहे ज्येष्ठ पत्रकार विचारवंत भाऊ तोर सेकर जेष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांची मुलाखत प्रसन्ना जोशी घेणार आहेत संविधान वाचवण्यासाठी महिलांचा सहभाग का आवश्यक या विषयावरती गोदावरी समूहा अध्यक्ष राजश्री पाटील माजी खासदार प्रीतम मुंडे राष्ट्रीयप्रवक्त्या हिना गावित या मार्गदर्शन करणार आहे तसेच समारोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि वर्किंग कमिटी सदस्य आ बाळासाहेब थोरात आ लहू कानडे नाला सोपारा आ सतीश ठाकुर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या प्रमुख उप स्थितीत होणार आहे तरी या शिखर अधि वेशनासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मकरंद घोडके कार्याध्यक्ष हरीश दिमोठे, अमोल कांकरिया उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख गणेश कवीटकर संघटक नितीन ओझा सरचिटणीस अमोल मतकर कार्यवाहक भारत रेघाटे,व गणेश जेवरे खजिनदार गोरक्ष नेहे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी केले आहे