महाविकास आघाडीच्या पराभवासाठी बुथ सक्षम करा- डाॅ.जैन
संघटनात्मक बैठक संपन्न, दर आठवड्यात घेणार आढावा..
महाविकास आघाडीच्या पराभवासाठी बुथ सक्षम करा-डाॅ जैन
संघटनात्मक बैठक संपन्न,दर आठवड्यात घेणार आढावा
संगमनेर दि.७ प्रतिनिधी-
विधानसभा मतदार संघात संघटीतपणे तुम्ही कार्यकर्ते काम करीत आहात. प्रत्येक बुथवर नियोजन चांगले झाले तर, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करणे अशक्य नाही. या मतदार संघातील सध्याची परिस्थिती पाहीली तर जनता परिवर्तन करण्याच्या मानसिकतेच आहे. पक्षाची ताकद ही बुथ स्तरापर्यंत अधिक भक्कम होण्यासाठी पुढचे दोन महिने सर्वांनी अधिक काम करण्याचे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे प्रभारी डॉ.अनिल जैन यांनी केले.
संगमनेर विधानसभा मतदार संघातील बुथ केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि संघटनात्मक पदाधिका-यांची बैठक डॉ.अनिल जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, सरचिटणीस सिताराम भांगरे, विधानसभा प्रमुख अमोल खताळ, विधानसभा संयोजक राहुल भोईर, ज्येष्ठ नेते राम जाजु, दादाभाऊ गुंजाळ, अभियंता सेलचे हरिष चकोर, उपाध्यक्ष अशोक कानवडे, मुख्यमंत्री लाडकी बहीण समितीचे सदस्य रऊफ शेख,राजेंद्र सांगळे, सौ.कांचनताई ढोरे, माजी नगरसेविका ज्योती भोर, शशांक नामन, रोहित चौधरी, शंकर वाळे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ.अनिल जैन म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुथस्तरावर केलेल्या चांगल्या कामामुळेच पक्षाचे मताधिक्य या विधानसभा मतदार संघामध्ये वाढले आहे. महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येणे खुप गरजेचे आहे. कारण राज्य सरकारने घेतलेल्या योजनांना पुढे घेवून जाण्यासाठी सरकार आले पाहीजे. यासाठी बुथस्तरावर संघर्ष करा असे सुचित करुन, प्रत्येक बुथ सक्षम करा, मतदानाचे नियोजन आत्तापासुनच सुरु करा. बुथ जिंकला तर विधानसभा निवडणूक जिंकु या मंत्रानुसार काम सुरु ठेवण्याचे अवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.
या विधानसभा मतदार संघात पक्षाचे काम परंपरेने आहे. अधिक ताकद लावली तर परिवर्तन अटळ आहे.उमेदवार कोन आहे याचा विचार न करता संघटीतपणे महाविकास आघाडीचा पराभव करायचा या उदिष्ठाने पुढील दोन महीने काम करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
महायुतीच्या जागा वाटपात हा विधानसभा मतदार संघ भाजपाला मिळावा अशी मागणी प्राधान्याने करण्यात आली. या मागणीला उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहमती दर्शविली. विधानसभा प्रमुख अमोल खताळ यांनी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या कामांचा आढावा बैठकीत सादर केला.
याप्रसंगी रोहिदास साबळे, रवींद्र दातीर, भगवान गीते, सुयोग गुंजाळ, संदेश देशमुख, विकास गुळवे,हरिश वलवे, अरुण थिटमे,महेश मांडेकर, सुरेश लांडगे, कैलास भरितकर, माधव थोरात सर, सुरेश दळवी, गोपीनाथ रूपवते, महेश जगताप, सतीश गोपाळे, दत्ता शेटे, बाळासाहेब गोसावी, शशिकांत मतकर, संतोष हांडे, सुरेश काळे,सुरेश निळे, मारुती घुले, पवन शिरतार, मारुती घुले, इसाक पटेल, इरफान मंसुरी, कैलास गोडसे, प्रदीप डेरे, मन्सूर पाटील, अतुल कातोरे, प्रशांत दातिर, लहानु चाबुस्कवर, रामनाथ दिघे, वाल्मीक शिंदे, विनायक थोरात, संपत गेठे, संदीप शेरमाळे सह पदाधिकारी उपस्थित होते.