आपला जिल्हाराज्य

तरुणांनी शिवरायांच्या विचारांचे ब्रँड अँबेसेडर होऊन काम करावे- आमदार तांबे

आ. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात 5000 युवकांचे शिवनेरी किल्ल्यावर श्रमदान

 

 

संगमनेर (प्रतिनिधी)–संपूर्ण देशासाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड किल्ले यांच्या संवर्धनासह त्यांचा विचार तरुणांनी जोपासावा. सर्वधर्मसमभाव महिलांचा सन्मान शेतकरी गोरगरिबांच्या प्रगतीचा आणि रयतेच्या विकासाचा शिवरायांच्या विचारांचे ब्रँड अँबेसिडर होऊन तरुणांनी राज्यात काम करावी असे आवाहन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले असून राज्यभरातील 5000 तरुणांनी आज शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे ,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या पाच हजार युवकांनी श्रमदान करून शिवरायांचा विचार गावागावात पोहोचवण्याची शपथ घेतली.

विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावरून आमदार सत्यजित तांबे व सत्यशील शेलकर यांच्या 500 गाड्यांच्या ताफा किल्ले शिवरानीकडे घोषणांच्या निनादात रवाना झाला. जुन्नर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून किल्ले शिवनेरीवर जाऊ सर्व तरुणांनी तीन तास श्रमदान केले. याचबरोबर स्वच्छता करून गडावर वृक्षारोपण केले.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील प्रत्येकासाठी सदैव प्रेरणादायी आहे. गड किल्ले हे महाराजांची जिवंत स्मारक असून त्याचे संवर्धन झाले पाहिजे. शिवनेरी किल्ल्यावर वन विभाग व पुरातन खाते यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने देखरेख ठेवली असून ही इतरांसाठी मार्गदर्शक आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक विचार आहे. हा विचार स्वराज्याचा लोकाभिमुख प्रशासनाचा माता भगिनींच्या सन्मानाचा सर्वधर्मसमभावाचा शेतकरी कल्याणचा न्यायाचा स्वाभिमान आणि संघर्षाचा आहे. हा विचार घेऊन प्रत्येक युवकाने काम केले पाहिजे.

तरुणांच्या जीवनामध्ये अडचणींवर मात करण्यासाठी किंवा आदर्श जीवन जगण्यासाठी शिवरायांचे विचार ही अत्यंत महत्त्वाची असून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व तरुणांनी शिव विचारांचा ब्रँड अँबेसिडर होऊन राज्यभरात काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना थोरात तांबे परिवाराने नेता नव्हे तर मित्र हे संस्कार दिले असल्याने राज्यभरातून मोठा मित्रपरिवार निर्माण झाला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात अडचणीत आपण कायम या तरुणांच्या सोबत असून मागील 22 वर्षांमध्ये संघटनेच्या माध्यमातून हे मित्र सोबत असल्याचे सांगून यापुढील काळात छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन प्रत्येक जण काम करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात शिव विचार व गड किल्ले संवर्धनाची शपथ उपस्थित पाच हजार तरुणांनी घेतली. यावेळी मर्दानी खेळ व पोवाडा यांच्या कार्यक्रमासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यानही झाले

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!