राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणार : डॉ. जयश्री थोरात
शक्ती अभियानाची संगमनेर तालुक्यात सुरुवात
राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणार : डॉ. जयश्री थोरात शक्ती अभियानाची
तसंगमनेर प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारावरच शक्ती अभियान आधारलेले आहे. राजकीय आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने शक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. संगमनेर तालुक्यातल्या प्रत्येक गावागावात युवक काँग्रेसच्या मार्फत सुरू शक्ती अभियान राबविण्यात येईल, अशी घोषणा संगमनेर तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केली.
शक्ती अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. जयश्री थोरात बोलत होत्या. यावेळी शक्ती अभियानाच्या संदर्भातील पोस्टरचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
- डॉ. जयश्री म्हणाल्या, महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार सन्मानपूर्वक मिळावा यासाठी शक्ती अभियानाच्या रूपाने हे आंदोलन सुरू झाले आहे. शिक्षण आणि नोकरीत महिलांना समान संधी मिळायला पाहिजे, केंद्र आणि राज्य सरकारच्या बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बजेटमध्ये सुद्धा महिलांशी संबंधित योजनांचा वाटा 50 टक्के असावा या मागण्यांच्या जोडीने नफरत आणि हिंसेच्या विरोधात महिलांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा असा या अभियानाचा हेतू आहे.
देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून वर्षभरापूर्वी युवक काँग्रेसने इंदिरा फेलोशिप ची घोषणा केली. राजकारण आणि पक्ष संघटनेत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने टाकलेले हे क्रांतिकारी पाऊल होते. इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील मुली आणि महिलांना व्यासपीठ मिळाले. आता ग्रामीण आणि शहरी भागात तळागाळात काम करणाऱ्या आणि नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी शक्ती अभियान ही सुवर्णसंधी आहे, त्यामुळे महिलांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. जयश्री यांनी केले.
चौकट
महिलांचा महिलांसाठी पुढाकार
महिलांचे प्रश्न महिला अधिक सक्षमपणे मांडू शकतात आणि सोडवूही शकतात. शक्ती अभियान हे महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि महिलांचा हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी उभारलेले आंदोलन आहे.
– डॉ. जयश्री थोरात
अध्यक्ष, संगमनेर तालुका युवक काँग्रेस