संजय गांधी निराधार योजना ऑगस्ट 2024 अखेरचे 2 कोटी 55 लाख 55 हजार 800 रुपये लाभार्थी खात्यात वर्ग – अमोल खताळ पाटील
संजय गांधी निराधार योजना ऑगस्ट 2024 अखेरचे 2 कोटी 55 लाख 55 हजार 800 रुपये लाभार्थी खात्यात वर्ग – अमोल खताळ पाटील
संगमनेर दि.30 ,प्रतिनिधी-
राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना ऑगस्ट 2024 अखेरचे 2 कोटी 55 लाख 55 हजार 800 रुपये महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लाभार्थी खात्यात आज वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण 5725 लाभार्थ्याना 84 लाख 38 हजार 100 रुपये ,माहे ऑगस्ट 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती 627 लाभार्थ्याना 9 लाख 32 हजार 700 रुपये , माहे ऑगस्ट 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 255 लाभार्थ्यांना 3 लाख 79 हजार 500 रुपये ,माहे ऑगस्ट 2024 चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण 5261 लाभार्थ्यांना 78 लाख 91 हजार 500 रुपये ,माहे ऑगस्ट 2024 चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती 681 लाभार्थ्यांना 10 लाख 21 हजार 500 रुपये , माहे जून ,जुलै व ऑगस्ट चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती 324 लाभार्थ्यांना 14 लाख 10000 हजार रुपये, माहे ऑगस्ट 2024 चे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 4242 लाभार्थ्यांना 54 लाख 82 हजार 500 रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आले आहे.
संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक या आठवड्यात घेण्यात येणार असून कागदपत्रे परिपूर्ण असणाऱ्यांनी तात्काळ जमा करावी. तसेच मुख्यमंत्री- लाडकी बहिण योजना ज्यांना पैसे भेटले आहे अश्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना मध्ये फॉर्म भरू नये
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून महायुती सरकारतर्फे सुरु असलेल्या विविध योजना तळागळातील संगमनेर तालुक्यातील नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केल्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थी यांना मिळाला आहे. तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्या संपर्क कार्यालयात अथवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जनसंपर्क कार्यालय, भाजप कार्यालय, संगमनेर येथे संपर्क साधावा असे आव्हान अध्यक्ष – संजय गांधी निराधार योजना, निवडणूक प्रमुख- संगमनेर विधानसभा भाजपा अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.