शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार ;
पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या
संगमनेर दि ५ प्रतिनिधी
तालुक्यातील एका शिक्षकाने इयत्ता तिसरीच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना समोर आल्यानंतर त्या शिक्षकाने इतरही मुलींवर अत्याचार केल्याचे समजले. ही घटना शुक्रवारी (दि ४) रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळशिराम यशवंतराव बांबळे (रा. डोळासणे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) असे या शिक्षकाचे नाव आहे. घटना घडताच गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप दिला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या शिक्षकाला ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संगमनेर तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. सकाळी मंथनचा क्लास असल्यामुळे इयत्ता ३ रीच्या विद्यार्थीनी लवकर आल्या होत्या. १०:३० वाजता प्रार्थना झाली आणि मुले-मुली वर्गात गेले. दुपारी १ वाजता शालेय पोषण आहार खाण्यासाठी सुट्टी दिली. त्यामुळे, सर्व विद्यार्थी जेवण करण्यासाठी बसले. यावेळी शिक्षक देखील जेवणासाठी गेले होते.
दरम्यान, दुपारी १:३० वाजताची वेळ होती. शाळेतून एक मुलगी रडत रडत घरी गेली. तेव्हा वडील कामावर गेले होते. तर आई घरकाम करीत होती. मुलगी अचानक घरी का आली? असा प्रश्न पडला. हे जाणून घेण्यासाठी आईने तिला जवळ घेतले. त्यानंतर काही काळानंतर पीडित विद्यार्थीनीने घडलेला प्रसंग सांगण्यास सुरूवात केली. तीने सांगितले. की, दुपारी जेवणाची सुट्टी झाली होती. मी जेवण करुन सर्वात पहिल्यांदा वर्गात आले होते. त्यावेळी वर्गात आमचे वर्गशिक्षक बाळशिराम बांबळे हे वर्गातच त्यांच्या खुर्चीवर बसलेले होते. पीडित मुलगी पाणी पिण्यासाठी तिच्या बाकड्यावर बसली होती. तेव्हा वर्गशिक्षक हा मुलीच्या जवळ गेला आणि त्याने मुलीशी अश्लिल चाळे केले. आपले सर असे काय करत आहे हे पीडित मुलीस समजले नाही. मात्र, त्यांनी आपल्या विद्यार्थीनीच्या मागून जाऊन घानेरडे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने या नराधमाच्या ताब्यातून सुटका केली आणि अन्य कोणावर अवलबून न राहता तिने घर गाठले.
पडीत मुलीच्या आईने कामावर गेलेल्या पतीस फोन लावला आणि तातकडीने घरी बोलावून घेतले. पीडित मुलीचे वडील आले असता त्यांनी थेट शाळा गाठली. शाळेचे मुख्याध्यापक यांची भेट घेतली. हा जो काही प्रकार मुलगी सांगत आहे तो खरा आहे का? त्यावर चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तर आणखी भयान सत्य बाहेर आले. त्यांनी आणखी चार ते पाच मुलींना बोलावून घेतले. त्यांचे जबाब घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अन्य मुलींनी देखील सांगितले. की, हे सर आमच्या छातीहून कायम हात फिरवितात, गुप्तांगाला हात लावण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि वर्गशिक्षक बाळशिराम यशवंतराव बांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी तातडीने त्या शिक्षकाला अटक केली आहे.