निर्दयी बापाने दोन चिमुकल्या मुलींना नदीपात्रात फेकले
हृदय पिळवटून टाकणारी घटना;

हृदय पिळवटून टाकणारी घटना;
निर्दयी बापाने दोन चिमुकल्या मुलींना नदीपात्रात फेकले
काही दिवासांपूर्वी अकोल्यात सहा मुलींच्या विनयभंगाची घटना घडली होती, तर आता चक्क बापानेच दोन चिमुकल्या मुलींना नदीपात्रात फेकल्याची घटना समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा नजीक असलेल्या लोणी कादमापूर येथे एक हृदय पिळवटून घटना उघडकीस आली आहे. निर्दयी बापानेच ७ वर्षीय सदफ व ९ वर्षीय आलिया या दोघा चिमुकल्यांना बाळापूर ते अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मन नदीमध्ये फेकल्याची खळबळजळ घटना समोर आली आहे.
कदमापूर येथील शेख हारून शेख शब्बीर यांनी दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार आज दुपारी पोलिसात दिली होती. दरम्यान सदर दोन्ही मुलींना अटाळी येथून ऑटो रिक्षात बसून दिले होते असे सांगितले होते. मात्र पोलिसांनी शेख हारून यावरच शंका आल्याने त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच आपल्या मुलींना नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने दाखविलेल्या बाळापुर येथील बायपासवरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण,हिवरखेड व अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या दोन्ही मुलींचा शोध घेतला जात आहे.
मुलींच्या बापाने हे कृत्य का केले, त्यांना नदीत का फेकलं याचाही शोध पोलीस घेत आहेत. मुलीच्या बापाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. एका बाजूला मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता पोटच्या चिमुलींना नदीत फेकल्याच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. अशा घटना थांबतील कधी असा प्रश्न निर्माण झालाय.