गुन्हेगारीब्रेकिंग न्युज

संगमनेरातून 42 लाखांची रोकड जप्त

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 संगमनेरातून 42 लाखांची रोकड जप्त

 अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संगमनेर दि १८ प्रतिनिधी  

आचारसंहिता लागू झाल्यानंतर संगमनेर हद्दीत झाडाझडती आणि होणार्या रोखीच्या व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर आहे. गुरुवारी (दि १७ ) गुजरात राज्यातील रहिवासी असलेल्या दोघांकडून हवाल्याची 42 लाख 15 हजार रुपयांची रोकड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरातून जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

मुकेशकुमार रमेशभाई पटेल (वय 36) आणि धवलकुमार जसवंतभाई पटेल (वय 32, दोघेही हल्ली रा. पार्श्वनाथ गल्ली, संगमनेर, मूळ रा. गुजरात) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेत असताना सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर रोकड असून त्याची विल्हेवाट लावत असल्यची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर येथे छापा टाकला. तेथे दोघांच्या ताब्यात 42 लाख 15 हजारांची रोकड मिळून आली. ही रक्कम भावेर रमाभाई पटेल (रा. पार्श्वनाथ गल्ली, संगमनेर) आणि आशिष सुभाष वर्मा (रा. अहिल्यानगर) यांची असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अतुल लोटके, अमृत आढाव, मनोज गोसावी आदींच्या पथकाने केली आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button