गुन्हेगारीब्रेकिंग न्युज

गावठी कट्टा विकण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटक

निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची दमदार कामगिरी

गावठी कट्टा विकण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटक
निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची दमदार कामगिरी
————————————————————————-
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः गुप्त खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने देशी बनावटीचा कट्टा विकण्यासाठी आलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना सोमवार ( ता. २८ ) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शहरातील कुरण रस्त्यावरील आझाद नगर गल्ली क्रमांक २ समोर घडली. संशयित आरोपीच्या ताब्यातील महागड्या कारसह पिस्तुल व मोबाईल असा सुमारे ३१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला आहे. 
याबाबत गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त खबऱ्याकडून संगमनेर शहर हद्दीत एक व्यक्ती देशी बनावटीचा गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याचे समजल्याने, त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी सहायक पोलिस निरिक्षक कल्पेश दाभाडे, काँस्टेबल राहुल सारबंदे, व राहुल डोके यांनी खासगी वाहनाने कुरण रोड परिसरात सापळा लावला. कुरण रोडवरील आझाद नगर गल्ली नं २ समोरील रस्त्यावर सव्वा अकराच्या सुमारास एक इसम त्याच्या ताब्यातील टोयाटो फॉरच्यूनर ( एमएच १५ एफएफ ९६३० ) मध्ये रस्त्याच्या कडेला अंधारात संशयितरित्या बसलेला दिसून आला. त्याच्याकडे विचारपूस करता त्याचे नाव आशिष सुनिलदत्त महिरे ( वय २८ ) मुळ रा. सातपुर, ता. जि. नाशिक, हल्ली रा. गोल्डन सिटी, गुंजाळवाडी  संगमनेर असे असल्याचे सांगितले. पोलीसांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली तसेच त्याच्या ताब्यातील फॉरच्युनर गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये तो बसलेल्या ड्रायव्हर सिटच्या खाली एक लोखंडी सिल्व्हर रंगाचे धातुचे गावठी पिस्तुल मिळुन आले. त्याबाबत विचारणा केली असता त्याने संगमनेरमध्ये अधिक रक्कम देणारा कोणी भेटल्यास त्यास मी सदरचा पिस्तुल विकणार होतो असे सांगितले. त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे आढळले.
त्याच्या ताब्यातून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा गावठी पिस्तुल व मॅगझीन, ३० लाख रुपये किंमतीची फॉर्च्यूनर गाडी,  एक लाख रुपये किंमतीचा अॅपलचा आयफोन, ४० हजार रुपयांचा दुसरा आयफोन, व १० हजारांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल असा सुमारे ३१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आशिष महिरे याच्या विरोधात देशी बनावटीचे पिस्तुल विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे ताब्यात बाळगताना वाहनासह मिळुन आला म्हणुन, शस्त्र सुधारणा अधिनीयम २०१९  चे कलम ३/२५, ५/२५, ७/२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ ( १ ) ( ३ ), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button