ब्रेकिंग न्युजराजकीय
आश्वी परीसरातील शेती १०० टक्के बागायत करण्याचे काम विखे परीवाराने केले ः अॅड. शाळीग्राम होडगर
आश्वी बुद्रूक येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ
आश्वी परीसरातील शेती १०० टक्के बागायत करण्याचे काम विखे परीवाराने केले ः अॅड. शाळीग्राम होडगर
आश्वी बुद्रूक येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ
संगमनेर ( प्रतिनिधी ) ः विकासाचे महामेरु असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठव्यांदा आमदार म्हणून बहुमताने निवडून आणायचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमधून प्रवरा नदीवर बांधलेल्या वसंत बंधाऱ्यामुळे प्रवरेचा पाणी अडल्याने, तसेच प्रवरेचे डावे उजवे कालवे, लिफ्ट इरिगेशन यंत्रणेमुळे या परिसरातील शेती शंभर टक्के बारमाही बागायती झाली आहे. या सर्वांचे श्रेय विखे परिवाराचे असल्याचे प्रतिपादन मांची हिल शैक्षणिक व वैद्यकिय संकुलाचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर यांनी केले. शिर्डी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचार शुभारंभाच्या नारळ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आदमभाई शेख होते.
ते म्हणाले, शेती हे बहुजन समाजाच्या उपजिविकेचे प्रमुख साधन आहे. शेतीसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था करुन त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी विखे परिवाराने मोठी मदत केली आहे. त्यामुळे कृषीपुरक व्यवसाय वाढून परिसराची व्यापारीपेठ समृध्द झाली आहे. माजी सरपंच हरीभाऊ ताजणे म्हणाले, आपल्या ४० ते ५० वर्षांच्या राजकिय कारकिर्दीत विखे परिवाराने वाड्या वस्त्यांवरील विकास कामे केली. यात दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या रस्त्यांचे मुरमिकरण केले. त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्यावर विरोधकांनी खडीकरण व डांबरीकरण करावे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कुठलाही मुद्दा सापडत नसल्यामुळे विरोधकाचे पोट दुखत आहे. प्रवरा बँकेचे संचालक माधवराव गायकवाड म्हणाले की, विखे पाटील यांच्या विकास कामाची यादी कधीही संपणार नाही. एका बाजुला विकासाचा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजुला भकास आहे. राजकारणामध्ये विकास कामांना महत्व आहे व सामान्य जनता ही विकास कामे बघुन मतदान करत असते. त्यामुळे सर्वानी कमळ चिन्हा समोरील बदन दाबुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचडं मतानी विजयी करायचे आहे. प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड म्हणाले, मी ३० वर्ष माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर काम केले. पण सर्व पालथ्या घड्यावर पाणी…. थोरातांनी आश्वी परिसरातील विकास कामांना बगल देण्याचे काम केल्याचा आरोपही जऱ्हाड यांनी केला.
प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालिका अॅड. रोहीणीताई निघुते म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने महिलासाठी विविध योजना आणल्या यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महामंडळाच्या एस टी मध्ये महीलांना ५० टक्के प्रवासामध्ये सवलत, मेडीकल तसेच इंजिनिअरींग सारख्या महागड्या शिक्षणामध्ये मुलींसाठी १०० टक्के फी सवलत देत सावित्रीच्या लेकींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे.
या वेळी संजय गांधी, ज्येष्ठ संचालक विनायकराव बालोटे, विजयराव चतुरे, हिंगे गुरूजी ग्रामपंचायत सदस्य सारिका जऱ्हाड, अनिस शेख, प्रा. कारभारी म्हसे आदींची भाषणे झाली. यावेळी प्रवरा बँकेचे संचालक अजय ब्राम्हणे, सोसायटी चेअरमन आण्णासाहेब जऱ्हाड, माजी संचालक प्रभाकर निघुते, शाळीग्राम चंद, विजयराव म्हसे, अनिल कंगणकर, जानकिराम गायकवाड, अशोक जऱ्हाड, नवनाथ ताजणे, भिमा शिंदे, भाऊसाहेब खेमनर, चांद शेख, व्यापारी सुशिल भंडारी, नामदेव होडगर, मच्छिंद्र ताजणे, बाबा गायकवाड आदि उपस्थित होते.