चाळीस वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही – खताळ
साकुर पठार भागातील गावांत महायुती च्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी
चाळीस वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही – खताळ
साकुर पठार भागातील गावांत महायुती च्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी
संगमनेर :प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागात पिण्याला पाणी नाही,आरोग्याची व्यवस्था नाही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मग यांनी चाळीस वर्षे केले तरी काय असा सवाल उपस्थित करत तुम्ही या भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही. त्यामुळे तुम्हाला आमदार पदावर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही अशी जोरदार टीका महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील दरेवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, खांबे, खरशिंदे, कणसेवाडी, चौधरवाडी, कवठे मलकापूर, बिरेवाडी, मांडवे, शिंदोडी, साकुर, जांबुत, हिवरगाव पठार, गिरेवाडी, कान्हेवाडी गावांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश काळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रौफभाई शेख, चिटणीस इसाक पटेल, शिवसेनेचे साकुर पठार भागातील युवा नेते गुलाब भोसले, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा प्रमुख सोमनाथ भालेराव, भाजप नेते बाबासाहेब गुळवे, रणखांबच्या सरपंच मंदाताई गुळवे, माजी सरपंच उज्वला गुळवे, खांब्याचे सरपंच रवींद्र दातीर, बिरेवाडीचे माजी सरपंच बाबाजी सागर, वरवंडीचे एकनाथ वर्पे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष भुजबळ, बाळासाहेब खेमनर, भाजप जिल्हा सरचिटणीस रोहित चौधरी, भाजप युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुयोग गुंजाळ, भाजप उपाध्यक्ष संदेश देशमुख, भाजप शहराध्यक्ष शशांक मेनन, सोमनाथ बारवे, राहुल शेजवळ, उज्वला गुळवे, सचिन गुळवे, मयूर गुळवे, धनंजय गुळवे, गंगाराम जाधव, संदीप गुळवे, संदीप वर्पे, सदाशिव पवार, तुषार पेंडभाजे, अजित कांबळे, गोपीनाथ रुपवते आदी मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खताळ म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारी खदखद दूर करण्यासाठी मला फक्त पाच वर्षे द्या. सर्व प्रथम मी तुमच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवेल. तसेच रस्त्याचा आणि आरोग्याचाही प्रश्न मार्गी लावेल. जर हे मी करू शकलो नाही तर मला परत दारात उभे करू नका. असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले आपल्याला निवडणूक टीका टिप्पणीवर जिंकायची नाही. तर विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आहे. त्यामुळे आपल्याला या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध काम करायचे आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याने जायचे आहे.
आपल्याकडे फक्त दहा-बारा दिवस शिल्लक राहिलेले आहे. निवडणूक एकदम निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. तालुक्यात परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराघरात जाऊन महायुती सरकारच्या योजना प्रत्येकाला समजून सांगा. या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन करायचे आहे. या निवडणुकीत अमोल खताळ हा उमेदवार नाही तर सर्व सामान्य मतदार हाच उमेदवार आहे. असे मानून प्रत्येकाने महायुतीच्या मागे भक्कम उभे रहा. असे आवाहन खताळ यांनी केले.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला सर्वाधिक 650 कोटीचा निधी आला आहे. आत्तापर्यंत एवढा मोठ्या प्रमाणात निधी कधी आला का? असा सवाल खताळ यांनी उपस्थित केला. जर निधी दिला असेल, तर तो मेव्हण्याला, भावाला, भाच्याला, बहिणीला यांना सोडून त्यांनी कधीच सर्वसामान्य मतदाराचा विचार केला नाही. त्यामुळे आम्ही सर्व जण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम उभे राहू असा विश्वास साकुर जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मतदारांनी दिला.