विरोधी उमेदवार पहिल्यांदाच पठार भागात आला – इंद्रजीत खेमनर
आमदार थोरात यांनी पठार भागातील प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या
आमदार थोरात यांनी पठार भागातील प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्यासंगमनेर ( प्रतिनिधी ) : संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पठार भागावर प्रेम केले असून पठार भागातील प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. याला सर्व जनता साक्षी आहे.याउलट समोर उभा असलेला उमेदवार पहिल्यांदाच पठार भागात आला असून ज्याला कधी हा भाग माहित नाही. जो कधी आला नाही. त्याने पठार भागाबाबत बोलावे हे मोठे आश्चर्य असल्याचा टोला इंद्रजीत खेमनर यांनी लगावला आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ साकुर मध्ये काढलेल्या संवाद रॅलीत ते बोलत होते. यावेळी समवेत शंकर पाटील खेमनर, जयराम ढेरंगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना इंद्रजीत खेमनर म्हणाले की, समोरचा उमेदवार हा चार – पाच पक्ष बदलून आता शिवसेनेमध्ये आला आहे. खरे तर मागील आठ दिवसांपूर्वी तो भाजपमध्ये होता. ओरिजनल भाजपवाले कुठे आहेत. असा प्रश्न आता तालुक्याला पडला आहे. सत्तेसाठी त्याने लगेच शिवसेना शिंदे गटाकडे उडी मारली. निष्ठावंत भाजप निष्ठावंत शिवसेना कुठे आहे. असा प्रश्न असताना हा उमेदवार पठार भागामध्ये आला आहे. जो पहिल्यांदा पठार भागामध्ये आला. ज्याला पठार भागातील वाडी वस्ती, गाव माहित नाही. या लोकांचे प्रश्न माहिती नाही. तो इथे येऊन विकास कामाबद्दल बोलतो आहे. आणि त्याच्यासोबत आलेले हे ही पहिल्यांदा पठार भागात आले हे स्वतः सांगत आहे.
याउलट आमदार बाळासाहेब थोरात यांनी पठार भागातील प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.गावो गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काम केले आहे. रस्ते, आरोग्य,शिक्षण या सर्व व्यवस्था निर्माण केल्या आहेत. शेतीसाठी प्रोत्साहन पर विविध योजना राबवली आहे असे सगळे असताना पठार भागात समृद्धी निर्माण करण्याकरता येथील नेतृत्वाने काम केले.
याउलट खताळ यांना हा परिसर कधी माहिती नाही,आणि निवडणूक झाली की ते पुन्हा कधीही इकडे येणार सुद्धा नाही त्यांनी पठार भागातील प्रश्नांवर बोलून भूलथापा देण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही त्यांनी लगावला. तर सचिन खेमनर म्हणाले की, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना असा प्रवास असलेला हा उमेदवार आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये पुन्हा त्याचा पक्ष बदललेला असेल. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तालुक्यात दबाव तंत्र निर्माण करण्याचे त्याचे काम असून अशा खबऱ्या लोकांना जनता कधीही थारा देणार नाही असे ते म्हणाले. यावेळी जांभुळवाडी,बिरेवाडी,जांबुत या ठिकाणी संवाद यात्रा झाली.