चाळीस वर्षात तालुक्याचा विकास न करता भकास केला – अमोल खताळ पाटील
साकुर गटातील विविध गावांत महायुतीच्या उमेदवारांच्या गाठीभेटी...
चाळीस वर्षात तालुक्याचा विकास न करता भकास केला – अमोल खताळ पाटील
साकुर गटातील विविध गावांत महायुतीच्या उमेदवारांच्या गाठीभेटी…
संगमनेर प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही. आजही पावसाळ्यात या तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. त्यामुळे तुम्ही नेमका विकास केला तरी काय असा सवाल उपस्थित करत त्यांनी सर्व सामान्य जनतेचा विकास न करता फक्त आपल्या मेव्हणे बहिण जावाई भाचा आणि वाळू भूमाफिया यांच्यासह त्यांच्या बगल बच्चांचा सोडून दुसरा कोणाचाही विकास न करता त्यांनी फक्त हा तालुका भकास केला असल्याची टीका महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केली.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासने, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, धुमाळवाडी, सतीची वाडी, बांबळेवाडी, गिरेवाडी, शेंडेवाडी, साकुर, जांभुळवाडी, जांबुत, हिवरगाव पठार, आनंदवाडी, चंदनापुरी, सावरगाव तळ या गावात मतदा रांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील दरेवाडी कुंभार वाडी, वरवंडी, खांबे, खरशिंदे, कणसेवाडी, चौधरवाडी, कवठे मलकापूर, बिरेवाडी, मांडवे, शिंदोडी, साकुर, जांबुत, हिवरगाव पठार, गि-हेवाडी, कान्हेवाडी गावांमध्ये जाऊन मतदारांच्या समक्ष भेटी घेत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रौफभाई शेख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, शिवसेनेचे साकुर पठार भागातील युवानेते गुलाब भोसले, भाजपचे उपाध्यक्ष बुवाजी खेमनर निमोणचे सरपंच संदीप देशमुख शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव खांब्याचे सरपंच रवींद्र दातीर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिट णीस सुयोग गुंजाळ तालुका अध्यक्ष संदेश देशमुख कर्जुलेपठारची माजी सरपंच रवींद्र भोर विद्यमान सरपंच किरण भागवत नंदू वाबळे धर्मेंद्र शिंदे विलास काकड राहुल मुके नंदाताई काकड संगीता बांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खताळ म्हणाले की, पठार भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही चुटकी सारखा सोडू शकले असते. परंतु तो प्रश्न सोडवण्याची तुमच्यात दाणत नाही. तुम्ही आतापर्यंत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आत्तापर्यंत तुम्ही फक्त झुलवत ठेवत दिशाभूल केली आहे. अजून किती दिवस जनतेची घोर अशी फसवणूक केली आहात असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की, ही विधानसभेची निवडणूक तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे या मतदार संघात नक्कीच परिवर्तन होणार आहे. निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या भागातील महिलांच्या डोक्या वरील हंडा खाली उतरवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंध विनायक करतोय अमोल खताळ यांचा पायी प्रचार… मी एका डोळ्याने अंध असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे काम धंदा करता येत नाही. माझी पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवत आहे. परंतु मला घरबसल्या काहीतरी व्यवसाय सुरू करावा म्हणून मी सत्ताधाऱ्यांकडे अनेक वेळा रेशन कार्ड व लोनसाठी विनंत्या केल्या. परंतु मला कोणीही कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. मात्र संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल खताळ यांच्याकडे मी गेल्यानंतर मी त्यांना माझी कैफियत मांडली. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रवरा सहकारी बँकेकडून मला व्यवसायासाठी लोन उपलब्ध करून दिले. आठ दिवसात रेशन कार्ड सुद्धा काढून दिले त्यामुळे मी आज माझा स्वतःचा गिरणी चालविण्याचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभा राहिलो आहे. हे फक्त अमोल खताळ यांच्यामुळेच झाले. त्यांना संगमनेर तालुका विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला. मी त्यांचे बोर्ड गळ्यात घालून गावोगावी जाऊन गोरगरीब मतदारांना अमोल खताळ यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहे.- श्री विनायक गोपीनाथ कांदळकर. अंध व्यक्ती तळेगाव दिघे ता संगमनेर.
डोळसणेच्या नंदा काकड यांनी दिली महायुतीच्या उमेदवाराला १५००ची मदत..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये प्रति महिना मिळत आहे. त्यामुळे महिला महायुती सर कारवर समाधानी आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासने येथे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ हे निवडणूक प्रचारार्थ आले असता या गावातील महिला नंदाताई विलास काकड या लाडक्या बहिणीने आपल्या भावासाठी लाडक्या बहिणी योजनेतून आलेल्या रकमेतील पूर्णपणे पंधराशे रुपये वर्गणी निवड णुकीसाठी दिली या त्यांच्या दातृत्वाचे संपूर्ण जिल्ह्यातून स्वागत होत आहे.