गुन्हेगारीब्रेकिंग न्युज

साकूरमध्ये भरदिवसा गोळीबार, दरोडेखोरांनी सोन्याच दूकान लूटल,

पोलिसांनी पाच पथक रवाना केली

साकूरमध्ये भरदिवसा गोळीबार, दरोडेखोरांनी सोन्याच दूकान लूटल,
पोलिसांनी पाच पथक रवाना केली

संगमनेर दी 11 प्रतिनिधी

तालुक्यातील पठारभागात साकूर येथे पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकान लुटल्याची घटना सोमवारी (दि. ११) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडलीय. भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली असुन पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी पथके रवाना केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, साकूर बसस्थानकजवळ निखील सुभाष लोळगे यांचं कान्हा ज्वेलर्स चे दूकान आहे. भरदिवसा पल्सर गाडीवर पाच दरोडेखोरांनी येऊन दूकानासमोर हवेत गोळीबार केला. तसेच थेट कान्हा ज्वेलर्सच्या दूकानात घुसून बंदूकीचा धाक दाखवत संपूर्ण सोन्याचा मालच लूटून नेला. पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेले होते. दरोडेखोरांनी गंठण, चैनी, मंगळसूत्र, वाट्या, कान चैनी, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदि सोन्याचं माल घेऊन पोबारा केला आहे. अचानक मास्क लावून दुपारच्या सुमारास पाच लोक पल्सर गाडीवर आले. त्यांनी गाडी दुकानाला खेटून बाहेर मध्य भागी लावली. कान्हा ज्वेलर्स मध्ये घुसले इकडे तिकडे पाहून त्यांनी कान्हा ज्वेलर्सच्या मालकावर रिव्हॉल्व्हर ताणली. दुकानचा मालक घाबरल्याने तो शांत बसला. मात्र, या दरोडेखोरांनी एक-एक दागिना काढून बॅग मध्ये मालका समोर भरला. संपूर्ण सोने बॅग मध्ये भरल्यानंतर रोख रक्कमदेखील काढून नेली.

मालकाचा मोबाईल काढून घेतला आणि दुकानच्या बाहेर पडत असताना आरडा ओरडा करून सावध करणार तेच बाहेर येऊन दरोडेखोरांनी भर रस्त्यात रिव्हॉल्व्हर काढून फायरिंग केली. आणि लगेच पल्सर गाडीवर बसुन पारनेरच्या दिशेने पळाले. ते पारनेरच्या दिशेने जात असताना पुढे मांडवा फाटा येथे देखील दरोडेखोरांनी गाडीवरून फायरिंग केली. पुढे खडकी रस्त्याला ज्वेलर्स दुकान मालकाचा मोबाईल टाकुन दिला. त्यानंतर पुन्हा खडकी रस्त्यावर फायरिंग करून पाच दरोडेखोर पारनेरच्या दिशेने पळाले.

दरम्यान, परिसरातील लोकांनी पोलिसांना फोन करून तात्काळ कळवले. तो पर्यंत आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शोध मोहीम सुरू केली. पोलीस उपअधीक्षक यांनी पथके तयार करून रवाना केले. कोटी रुपयांचा दरोडा पडल्याने साकुर परिसरातील अनेकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button