पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवा-अमोल खताळ
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी दिला निमोण तळेगावकरांना सल्ला..
पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवा-अमोल खताळ
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी दिला निमोण तळेगावकरांना सल्ला..
संगमनेर :प्रतिनिधी-
तळेगाव निमोण परिसराला भोजापुरचे पाणी माजी मंत्री स्व. बी जे खताळ यांच्या माध्यमातून मिळाले आहे. मात्र गेली ४० वर्षे ज्यांनी या तालुक्याची सत्ता भोगली त्यांनीच खऱ्या अर्थाने या निमोन तळेगाव परिसरातील जनतेला पाण्यापासूनवंचित ठेवले असल्याची जोरदार टीका महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील निमोण गटात येणाऱ्या समनापुर, सुकेवाडी, कुरण, खांजापुर, मालदाड, सोनोशी, नान्नज दुमाला, पारेगाव बु।, क-हे पळसखेडे, निमोण, पिंपळे, चिंचोलीगुरव, देवकवठे, काकडवाडी, पारेगाव खुर्द, पोखरी हवेली गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर निमोण येथे आयोजित करण्यातआलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विष्णू घुगे होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुदाम सानप, दादाभाऊ गुंजाळ, भीमराज चत्तर, मारुती घुगे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे,निमोण सरपंच संदीप देशमुख, माजी उपसरपंच साहेबराव आंधळे, भाजप युवा नेते श्रीकांत गोमासे ,किसन चत्तर हरिशचंद्र चकोर, भाजप नेते गोरक्षनाथ कांडेकर संपत फड गोरख मंडलीक, मंगेश वालझडे, भाजप महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, बाबा आहेर, लहानू नवले, कासारेंचे सरपंच नवनाथ कानकाटे, मालदाडचे जेष्ठ नागरिक माधव नवले, रोहिदास नवले, गोरक्ष नवले, अजय नवले, उत्तम नवले, भाऊसाहेब नवले, सोने वाडी चे आनंदा गोमासे, पळसखेडेचे ज्येष्ठ नेते गंगाधर कांडेकर, प्रदीप कांडेकर, दिपक वाघ, तुषार सानप, गोरक्ष सानप, नवनाथ सानप, अर्जुन कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खताळ म्हणाले की, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तळेगाव निमोण परिसरात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापासून कायमच वंचित ठेवले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील सर्व जनतेने परिवर्तन करायचे ठरविलेले आहे तुम्ही ज्यांना चाळीस वर्षे दिले त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. आत्तापर्यंत भोजापुर आणि निळवंडेच्या नावाखाली तुमची फक्त फसवणूक केली आहे. त्यामुळे मला फक्त पाच वर्षे संधी द्या. मी या भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून सोडविल्याशिवाय राहणार नाही. जर या भागातील पाण्याचा प्रश्न मी सोडविला नाही तर मी या निमोन तळेगाव भागात फिरकणार सुद्धा नाही असाही विश्वास खताळ यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला.
मालदाडच्या सेवानिवृत्त शिक्षकाने दिले निवडणुकीसाठी ११ हजार…
संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधून लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशातून फुल न फुलाची पाकळी म्हणून डोळसणे कासारे येथील महिलांनी मदत केली. तर निमोण येथील सभेत लाडक्या बहिणींनी आपल्या ऐपतीप्रमाणे कोणी शंभर दोनशे पाचशे असे करत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना निवडणूक खर्चासाठी मदत केली. तसेच मालदाड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मारुती नवले यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. तर निमोणचे भाजप ज्येष्ठ नेते मारुती घुगे यांनी सुद्धा उमेदवार खताळ यांना निवडणूक खर्चासाठी मदत करत आपणच ही निवडणूक आता हातात घेतली असल्याचे दाखवून दिले आहे.
अदृश्य हात माझ्या बरोबर आहे-खताळ
संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचा ऱ्यांचा आणि त्यांच्या काँग्रेसच्या कार्यक र्त्यांचा माझ्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात हात आहे याचा प्रत्यय मतदानाच्या रूपाने नक्कीच दिसून येईल त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.