Uncategorized

महायुतीचे अमोल खताळ यांनी शहरातील मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी…

महायुतीचे अमोल खताळ यांनी शहरातील मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी…

 

संगमनेर/ प्रतिनिधी-
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी शहरातील विविध उपनगरात प्रचार फेरी काढत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या ग्रामीण भागासह शहरी भागातही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे ते नक्कीच विजयी होतील असा दावा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व गावांचा जिल्हा परिषद गटनिहाय दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी आज संगमनेर शहरातील उपनगरात येणाऱ्या इंदिरानगर, चैतन्यनगर, जनतानगर, गणेशनगर, शिवाजीनगर व मालदाड रोड परिसरातील मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत संवाद साधला. यावेळी अनेक लाडक्या बहिणींनी उमेदवार खताळ यांचे औक्षण केले. तर मालदाड रोड परिसरातील लाडक्या बहिणींनी उमेदवार खताळ यांना मोठ्या प्रमाणात राख्या बांधत आम्ही तुमच्या मागे भक्कमपणे उभ्या आहोत असा विश्वासही दिला.
यावेळी समवेत भाजपचे भाजपचे पक्ष निरीक्षक जगदीश मखवाना, ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, शहर संघटक अमोल रानाते, भाजप सरचिटणीस राहुल भोईर, भाजप नेते संपतराव गलांडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भारत गवळी, शशांक मेनन, अंबादास अनमल, भाऊ मस्के, श्याम कोळपकर, सविता दिघे, नीलम खताळ, ताई कानकाटे, दिपाली वावळ, कावेरी नवले वैशाली रानाते यांच्यासह शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button