स्वतःचा विकास करायचा नाही, तर मला जनतेचा विकास करायचा- अमोल खताळ पाटील
महायुतीच्या उमेदवार अमोल खताळ यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी…
स्वतःचा विकास करायचा नाही तर मला जनतेचा विकास करायचा- अमोल खताळ पाटील
महायुतीच्या उमेदवार अमोल खताळ यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी…
संगमनेर/ प्रतिनिधी-
आमच्या अनेकांच्या पिढ्या संपल्या परंतु या तालुक्यात विकास कशाला म्हणतात ते आम्हाला पाहायला मिळाले नाही. असे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगत आहे. परंतु या तालुक्यातील विकास काय आहे हे मी पुढील कार्यकाळात दाखवून देईल. मला माझा स्वतःचा विकास करायचा नाही. तर या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे. असा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील गोडसेवाडी आणि मिर्झापूर येथील मतदारांच्या महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत खताळ बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे,
काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केलेले नांदुरी दुमालाचे माजी सरपंच ऍड.मिनानाथ शेळके, मिर्झापूरच्या विद्यमान सरपंच कमल हांडे, त्यांचे पती सिताराम हांडे, अनिल निळे, सुरेश निळे, दत्ता हांडे, पंढरी वलवे, केशव वलवे, गणेश वलवे,संतोष वलवे,नवनाथ नवले,संदीप भालके, रमा निळे, सोमनाथ नेहे, संजय कवडे, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवार खताळ म्हणाले की, प्रत्येक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरुण लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात माझ्या निवडणुकीसाठी अर्थसहाय्य करत आहे. त्यामुळे ही निवडणूक लाडक्या बहिणीनी तसेच ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी तसेच सर्वसामान्य जनतेने हातात घेतले आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला. बहिणीच्या माध्यमातून धनादेश देण्यात येत आहे. अनेक नागरिक धनादेश देऊन माध्यमा अमोल जी खाताळ यांना मदत करत आहे व ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. संपूर्ण तालुक्याने यावेळी परिवर्तन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे येणाऱ्या २३ तारखेला
संगमनेर विधानसभेमध्ये जो चमत्कार होईल तो संपूर्ण राज्य देश पाहील असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव यांना मोठ्याप्रमाणात निधी मिळवून दिला तर लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील असंख्य बहिणींना या योज नेचा लाभ मिळवून दिल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच उमेदवार खताळ यांना होणार आहे.- ऍड. मिनानाथ शेळके
माजी सरपंच नांदुरी दुमाला.