Uncategorizedगुन्हेगारीब्रेकिंग न्युजराजकीय

भाजपचे स्टेट्स ठेवतो म्हणून एकाला बेदम मारहाण

तालुक्यातील मिर्झापूर येथील घटना ; एक आरोपी ताब्यात  

भाजपचे स्टेट्स ठेवतो म्हणून एकाला बेदम मारहाण

तालुक्यातील मिर्झापूर येथील घटना एक आरोपी ताब्यात  

संगमनेर दि १७ प्रतिनिधी

शनिवारी (दि १६ ) रात्री शेतात पाणी भरत असताना चार ते पाच जणांनी तू युतीच्या उमेदवाराचा प्रचाराला का गेला तसेच “तू बीजेपीचा व अमोल खताळ याचे स्टेट्स का ठेवतो” असे म्हणत बेदम मारहाण केली. त्याला जबर मार लागल्याने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरीनाथ संपत वलवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि १६ ) रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता, अचानक पाणी बंद झाल्याने बघण्यासाठी गेले असता शेताच्या शेजारी असलेला पाईपवरून विजय ज्ञानेश्वर वलवे याने बोलोरो (एम एच १४ ए सी ८७३६) गाडी गेल्याने पाईप निघाला होता. याबाबत त्यांना गाडी पाईपवरून का घातली असे विचारणा केली असता, गाडीतून विजय ज्ञानेशवर वलवे गीताराम सयाजी वलवे, राहुल चंद्रभान वलवे हे गाडीतून उतरून विजय याने पंढरीनाथ यांची गच्ची पकडून विरोधात काम करतो, भाजपचे आणि अमोल खताळ यांचे स्टेट्स ठेवतो का ? असे म्हणून दोन कानामागे दिल्या. गाडीतील गीताराम व राहुल यांनी गाडीतील काठ्या व रॉड आणून याचा कर्यक्रम करू पाठीवर आणि उजव्या दंडावर मारहाण केली. त्यावेळी अंधारात बांधाजवळ असलेले कैलास गणपत वलवे बाजीराव रामनाथ वलवे आणि तन्मय विजय वलवे (सर्व रा. मिर्झापूर, ता. संगमनेर) हे भांडणे चालू असताना त्याठिकाणी आले. त्यावेळी तन्मय याने त्याच्या हातातील काठीने व डोक्यावर मारहाण केली.

त्यानंतर कैलास आणि बाजीराव याने पंढरीनाथ याला खाली पाडून पाठीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यावेळी विजय ज्ञानेशवर वलवे याने फिर्यादी यांचे मुंडके धरून दंडाच्या पाण्यात खाली दाबून धरले व आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तालुका पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button