राजकीय

ते सत्तेसाठी कोलटउड्या मारणारे-आमदार थोरात

धांदरफळ घटनेतील बिनडोक वक्तव्य लांछनास्पद...

ते सत्तेसाठी कोलटउड्या मारणारे-आमदार थोरात

धांदरफळ घटनेतील बिनडोक वक्तव्य लांछनास्पद…

वाईट वक्तव्य संगमनेर तालुका सहन करत नाही
धांदरफळ येथे विराट सभा…

संगमनेर (प्रतिनिधी)- आपण कायम पुरोगामी विचार जपला असून सर्वांना सोबत घेऊन काम केले. मात्र काही लोक संगमनेर तालुक्यात येऊन दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. धांदरफळ मधील बेताल वक्तव्य बिनडोक व्यक्तीने त्यांच्या उपस्थितीत केलेले लांचनास्पद वक्तव्य आहे. तालुक्यातून दहशत निर्माण करणारे ,समोरचा उमेदवार आणि त्याचे पाठीराखे हे सत्तेसाठी कोलटउड्या मारणारे आहेत त्यांना त्याची जागा दाखवा असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

धांदरफळ बुद्रुक येथील चौकात प्रचारार्थ सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉ जयश्रीताई थोरात, विक्रम खताळ, रामहरी कातोरे , बाळासाहेब देशमाने, अनिल काळे माधवराव कानवडे मिलिंद कानवडे पांडुरंग घुले संपतराव डोंगरे बाळासाहेब गायकवाड सौ उज्वला देशमाने दत्ता कासार राष्ट्रवादीचे चंद्रकांत घुले,सौ. अमृता वाकचौरे, अनिल देशमुख आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, कॉम्रेड दत्ता देशमुख यांचा पुरोगामी विचारांचा वारसा , बी जे.खताळ पाटील यांचा प्रशासनाचा वारसा आणि भाऊसाहेब थोरात यांचा स्वच्छ सहकार आणि निर्मळ कामकाजाची पद्धत या समृद्ध परंपरेचा वारसा आपण सांभाळत आहोत.

तालुक्यातील जनतेला प्रेम केले आणि त्यामुळे राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या संधीचा उपयोग हा तालुक्याच्या विकासासाठी केला कधीही भेदभाव केला नाही. मात्र आता येथे काही लोक येऊन दडपशाही निर्माण करू पहात आहेत. याकरता त्यांनी बगलबच्चे सांभाळले आहेत. हे खबरे खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासात अडचणी निर्माण करत आहेत. या खबऱ्यांचे एक तरी योगदान दाखवा असे सांगताना समोरचा उमेदवार व त्याचे पाठीराखे यांनी सत्ते करता किती कोलट उड्या मारल्या हे सर्वांना माहीत आहे त्यांना त्यांची वेळीच जागा दाखवा.

खरे तर धांदरफळ मध्ये केलेले वक्तव्य हे समस्त महिला भगिनींचा अपमान करणारे आहे. महिलांचा अपमान झाला आणि संगमनेर तालुका पेटून उठला राजकीय विचार बाजूला ठेवले जेव्हा जेव्हा तालुक्याच्या अस्मितेला ठेच लावण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तालुका पेटून उठतो याचा अनुभव आता त्यांनी घेतला आहे.
पुढील पन्नास वर्षात कोणी वाईट बोलण्याची हिंमत करता नाही असे सांगताना खब-यांसह तालुक्याच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांचा निवडणुकीच्या माध्यमातून बंदोबस्त करा असे आवाहन त्यांनी केले

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून मी काम करत होते मी असं काय चूक केली होती की याच जागेवर माझ्यावर आरोप झाले तो समस्त महिलांचा आणि आईचा अपमान होता या अपमानाचा बदला वीस तारखेला मोठे मताधिक्य आमदार बाळासाहेब थोरात यांना देण्याबरोबर वाईट वक्तव्य करणाऱ्या व त्यांना समर्थन देणाऱ्या प्रवृत्तीचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन त्यांनी केले

यावेळी बाळासाहेब गायकवाड, रामहरी कातोरे,अमृता वाकचौरे, मिलिंद कानवडे, अनिल काळे यांनी आपली मनोगती व्यक्त केली

यावेळी युवक नागरिक महिला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button