ब्रेकिंग न्युज

बेताल वक्तव्य करणाऱ्या देशमुख यांना पोलिस निरीक्षकांनी सिन्नरमध्ये लपवले?

टॉवर लोकेशन शोधण्याची गरज, काँग्रेस आंदोलन करणार का? 

बेताल वक्तव्य करणाऱ्या देशमुख यांना पोलिस निरीक्षकांनी सिन्नरमध्ये लपवले?

टॉवर लोकेशन शोधण्याची गरज, काँग्रेस आंदोलन करणार का? 

संगमनेर दी 18 

बेताल वक्तव्य करणारा वसंत देशमुख याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याला तालुका पोलीस ठाणे येथे हजर करून मेडीकल करण्यात आले. त्यानंतर,नाशिक येथे रवाना करण्याचे डॉक्टरांनी पत्र दिले. परंतु वसंत देशमुख हे नाशिकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये न जाता सिन्नर मध्येच पोलिसांसोबत व्ही आय पी थाटात मुक्काम केला असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. त्यानंतर, सकाळी नऊ वाजता सरकारी रुग्णलयात दाखल होऊन पुन्हा संगमनेर कोर्टात हजर केले. परंतु, रात्रीचे संगमनेरात १२ वाजता मेडीकल झालेला माणुस सकाळी नऊ वाजता पोहचतो कसा? पोलीस सोबत असताना हा प्रकार घडतो कसा? या वाचाळविराला कोणाचे राजकीय पाठबळ होते का? या संपूर्ण प्रकरात पोलिसांना मोठा मलिदा मिळत असल्याची जनतेत सुरू आहे.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे युवा संकल्प सभेत वसंत देशमुख यांची डॉ. जयश्री थोरात यांच्यावर बोलत असताना जीभ घसरली होती. त्यानंतर, वसंत देशमुख यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला. वसंत देशमुख यांनी धांदरफळ मधुन धुम ठोकली. ते दोन दिवस फरार होते. वाचाळवीर वसंत देशमुख यांना पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात हजर केले. तेथुन वसंत देशमुख यांना मेडीकल करण्यास पाठवले असता त्यांच्या छातीत दुखू लागले. घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णलयातील डॉक्टरांनी नाशिक येथील सरकारी दवाखान्यात जाण्याचे पत्र दिले.

मात्र, वसंत देशमुख व सोबत असणाऱ्या पोलिसांनी सिन्नर येथील घोटी हायवेलगत असणाऱ्या मोठ्या वास्तू मध्ये मुक्काम ठोकला आणि दुसऱ्या दिवशी नाशिक येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये सकाळी नऊ वाजता हजर झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. खरंतर, तालुक्यातुन रात्री जाणारी गाडी सकाळी पोहचती कसे. वसंतराव यांच्या छातीत कळ अचानक येते कसे हा सर्व संशोधनाचा भाग असुन जेल मध्ये न जाता बाहेर पडण्याचा मार्ग होता का?असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिक विचारत आहे.

पोलिसांकडून देशमुखांना व्हीआयपी संरक्षण

वसंतराव देशमुख यांच्यामुळे तालुक्याचे राजकीय वातावरण दुषित झाले. त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, या वाचाळ वीराला जेल मधील मुक्कामा ऐवजी व्हीआयपी संरक्षण देऊन सिन्नर मध्ये मुक्काम ठोकला कसा? नाशिकला जाणारा रस्ता अवघा एक तसाचा असताना उशीर झाला कसा? पोलिसांवर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आता लागले आहे.

adminuniquemarathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button