“आली रे आली, आता तुमची बारी आली” -डॉ विखे
महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सांगता सभेत डॉ विखे यांनी घेतला आ थोरात यांचा समाचार
“आली रे आली, आता तुमची बारी आली” -डॉ विखे
महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सांगता सभेत डॉ विखे यांनी घेतला आ थोरात यांचा समाचार
संगमनेर /प्रतिनिधी-
तुम्ही चाळीस वर्षात या संगमनेर तालु क्यातील जनतेचे कंबरडे मोडले आहे त्यामुळेआता सर्वसामान्य जनतापरिवर्तन करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे त्या मुळे हीच सर्वसामान्य जनता या निवडणुकीत तुम्हाला पाडल्याशिवाय स्वस्त बस णार नाही. तसेच “आली रे आली, आता तुमची बारी आली” असाही खणखणीत इशारा डॉ सुजय विखे पाटील यांनी आमदार थोरात यांचे नाव न घेता दिला
संगमनेर शहरातील नवीन नगर रोडवर महायुतीचे उमेदवार अमोल खताळयांच्या प्रचाराची सांगता सभा भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याप्रमुख उपस्थितीत झाली त्यावेळी बोलताना ते म्हणाले की महा युतीची संगमनेरात मोठी सभा होऊ नये यासाठी संगमनेरच्या आमदारांनी ४ दिवस जाणता राजा मैदान बुक करून टाकले मात्र त्या मैदानावरती त्यांनी एक ही सभा घेतली नाही मात्र आमच्या सर्व सामान्य मतदारांना कुठ ल्याही मैदानाची गरज नाही तुम्ही किती दडपशाही केली आणि कितीही सभेचे मैदानी बुक केली तरी आता संगमनेरातील सर्वसामान्य जनतेने परिवर्तन करण्याचे ठरविले आहे त्यासाठी जनताच आता रस्त्यावर उतरली असून तुम्हाला 23 तारखेला पाडल्याशि वाय गप्प बसणार नाही असा हल्लाबोल भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केला
संगमने विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार राज्य व देश पातळीवरील नेत्यांची सभा संगमनेरात घेऊ शकले नाही मात्र त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात येऊन सभा घेतल्या तसेच जिल्ह्यातील सर्वच नेत्यांच्या शेतकर्याचा जाणता राजाम्हणून ओळखल्या जाणारे शरद पवार यांची ही सभा घेतली तसेच देशाच्या काँग्रेस पक्षा च्या राष्ट्रीय युवा नेत्या प्रियंका गांधी यांची सभा घेतली फक्त उमेदवार राहता तालु क्यातील असल्यामुळे या सभेला पोम्प्लेट पासून ते सभेच्या स्टेज पर्यंत होणारा सर्व खर्च संगमनेर कडून होत होता व सभेला येणारे सुद्धा संगमनेरचे होते मात्रआजच्या सभेला कोणी कामगार नाही भाडोत्री लोक आणले नाही नाही तर ही सर्वसामा न्य जनता तुमचा खोटा उपटायला जमा झाली येथून पुढील काळात या संगमनेर तालुक्यात कोणाची दादागिरी आणि दडपशाही चालणार नाही तालुक्यातील जनतेने परिवर्तन करण्याचा निश्चय केला आहे आणि तो ते परिवर्तन 23 तारखेच्या मतदानातून तुम्हाला दिसूनच येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला शिर्डी मतदार संघात दहशती से आजादी असा नारा दिला आहे आणि संगमनेरातील त्यांच्या बोर्डावरती सुद्धा तेच घोषवाक्य लिहिले आहे त्यामुळे नेमकी दहशत कोणाचे आहे हे मला समजत नाही तुम्ही नेमकी दहशत कोणाची मोडून काढणार सर्वसामान्य जनतेची यांनी कुणाची असा सवाल त्यांनी उपस्थित केला
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ म्हणाले की संगमनेर तालुक्यात सुरू अस णारे दादागिरी दडपशाही मोडीतकाढण्या साठी सर्वसामान्य जनतेने माझीउमेदवारी हातात घेतली आहे त्यामुळे या सर्वसामा न्य जनता परिवर्तन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असाही विश्वास खताळ यांनी व्यक्त केला या सभेला शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्ताने संपूर्ण शहरातून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी संपूर्ण शहरातून मोटरसायकल रॅली काढून सर्व वातावरण भगवे माई केले होते जय भवानी जय शिवाजीचा नारा ते विजय दादा विखे पाटील यांचा विजय असो अमोल खाताळ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करत शहर दणाणून सोडले होते.