Uncategorized
संगमनेरला ११ हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १ कोटी ६५लाख २० हजार १०० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग…
संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ यांची माहिती..
संगमनेरला ११ हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १ कोटी ६५लाख २० हजार १०० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग…
संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ यांची माहिती….
संगमनेर/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धपकाळ योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत ११ हजार ६१४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती १ कोटी ६५ लाख २० हजार१००रुपये लाभार्थ्यांच्या बँकखात्या वर वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार माजी महसूलमंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा माजी व खा डॉ. विखे पा यांनी अमोल खताळ यांच्यावरती संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकल्यानंतर आमदार खताळ पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील गोरगरीब, वृद्ध निराधार ,दिव्यांग, विधवा ,परीतक्ता बंधू आणि भगिनींना वरील या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गावागावात शिबिरे राबविली त्या माध्यमातून सप्टेंबर २०२४ अखेर संजय गांधी निराधार अनु दान योजना अनुसूचित जाती या प्रवर्गातील ६२० लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ९लाख २२ हजार २००रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २६२ लाभार्थ्यांना ३ लाख ९९ हजार रुपये, श्रावण बाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण या प्रवर्गातून ५ हजार ३७९ लाभार्थ्यांच्या बँक खात्या वर ८० लाख ८३हजार ५०० रुपये , श्रावण बाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गातील ६८५ लाभार्थ्याच्या बँक खात्यावर १० लाख २७ हजार ५०० रुपये, श्रावण बाळ गट ब सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२३ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ४ लाख ८४ हजार ५०० रुपये,श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४ हजार ३३५ लाभार्थ्यांना ५६ लाख ३ हजार ४०० असे एकूण १ कोटी ६५ लाख २० हजार १०० रुपये खात्यावर वर्ग झाले असून उर्वरित लाभा र्थ्यांचे अनुदान लवकरात लवकर वर्गकेले जाईल असेही आमदार खताळ यांनी सांगितले.